

Minister Sanjay Shirsat criticizes Rohit Pawar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कोरेगाव जमीन घाटाळा प्रकरणावरून पार्थ पवार यांचे बंधू आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणावर रोहित पवार यांनी मौन बाळगल्याने शिरसाट यांनी अरे रे.. माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली अशी खोचक पोस्ट केली आहे.
पार्थ पवार यांच्या कंपनीलचा चाळीस एकर भूखंड खरेदीचा घोटाळा नुकताच समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र, इतरवेळी अनेक मुद्द्द्यांवर बोलणारे आमदार रोहित पवार हे सध्या शांत आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांनी रोहित पवार यांना उद्देशून केली.
सोशल मीडियावर पोस्ट अरे रे.. माझ्या लाडक्या पोपटाची (रोहित पवार) वाचा गेली असे त्यांनी म्हटले आहे. याविषयी संजय शिरसाट यांनी आज पुन्हा प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. शिरसाट म्हणाले, काही लोकांना थोडा किडा असतो. ते सतत विद्वानासारखे बोलत असतात. जणू काही तेच न्यायाधीश आहेत.
मात्र, हे लोक चालू घडामोडींवर बोलताना मला दिसले नाहीत. मागे एकदा माझी दाढ दुखत होती, त्यावेळी रोहित पवारांनी माझी दातखिळी बसली असे म्हणत पोस्ट टाकली होती. त्यामुळे मला आज त्यांची आठवण झाली. आता त्याची वाचा गेली की काय असे मला वाटले, असे शिरसाट म्हणाले.