Diwali 2026 : दीपोत्सवाच्या चार दिवसांत दोन हजार कोटींची उलाढाल

दुष्काळाच्या सावटातील उभारीने व्यापारीवर्ग सुखावला
Diwali 2026
Diwali 2026 : दीपोत्सवाच्या चार दिवसांत दोन हजार कोटींची उलाढालfile photo
Published on: 
Updated on: 

Turnover of two thousand crore rupees during the four days of the festival of lights (Deepotsav)

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : यंदाचा दिवाळी-पाडवा आणि भाऊबीजेचा सण शहरातील बाजारपेठेसाठी चांगलाच लाभदायी ठरला आहे. दुष्काळाच्या सावटातही या शुभमुहूर्तावर बांधकाम क्षेत्र, वाहन बाजार, सराफा मार्केट, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्ससह एकूण बाजारपेठेने अनपेक्षित उभारी घेतल्याने व्यापारीवर्ग सुखावला. सणासुदीच्या या चार दिवसांत बाजारपेठेत सुमारे दोन हजार कोटीपर्यंतची उलाढाल झाल्याचे व्यापारी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितले.

Diwali 2026
Nanded Crime : नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्‍हे शाखेची कारवाई

साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या दिवाळी पाडव्यानिमित्ताने बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल होत असते. खासकरून बांधकाम क्षेत्र आणि वाहन बाजारात या एका दिवसातच सर्वाधिक व्यवसाय होतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गृहप्रवेश आणि किती वाहने रस्त्यावर उतरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.

Diwali 2026
Nanded News : जेवण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्यास नकार, वाढदिवसाच्या दिवशीच पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

शहरातील वाहन क्षेत्र तज्ज्ञ सुबोध जोशी यांनी सांगितले की, धनतेरस आणि पाडवा दोन्ही मुहूर्तावर तब्बल पाच हजारांहून अधिक दुचाकी आणि सहाशे चारचाकी वाहने रस्त्यावर उतरली. यात ई-वाहने १० ते १५ टक्के विक्री झाली. तरी पारंपारिक इंधनावरील वाहनांना मोठी पसंती मिळाल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात तेजीचे वातावरण राहिले. दुष्काळामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांचा काही प्रमाणात वाहन क्षेत्राला फटका जाणवल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय कापड, किराणा आणि जनरल मार्केटमध्येही ग्राहकांची मोठी रेलचेल पहायला मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.