Samruddhi Highway Accident : दोन कंटेनरच्या मध्ये बसले जेवायला, तितक्‍यात ट्रकने दिली धडक, दोघांचा जागीच मृत्‍यू

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील डवाळा शिवारात घडला अपघात
Accident News
Samruddhi Highway Accident : दोन कंटेनरच्या मध्ये बसले जेवायला, तितक्‍यात ट्रकने दिली धडक, दोघांचा जागीच मृत्‍यूFile Photo
Published on
Updated on

Truck hits container on Samruddhi Highway; Two killed

वैजापूर : पुढारी वृत्तसेवा

भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने कंटेनरला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.२६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील डवाळा शिवारात घडली.

Accident News
Sambhajinagar Encounter : लड्डा दरोडा प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणारे दोन कंटेनर उभे करून या दोन वाहनांच्यामध्ये महामार्गावर चालकांसह क्लिनर जेवण करीत असतानाच आयशरने धडक दिली. या घटनेत आयशर व कंटेनर चालक अशा दोघांचा मृत्यू झाला.

मोहंमद जावेद (वय २६ कंटेनर चालक रा. झारखंड) व आयशर चालक (४०) असे दोघेजण या घटनेत ठार झाले, तर मोहंमद इकबाल हुसेन (३० रा. झारखंड) असे जखमीचे नाव आहे. आयशर चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही.

Accident News
World Turtle Day : अंधश्रद्धेमुळे घेतला जातोय कासवांचा जीव; अनेक प्रजाती धोक्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर दोन कंटेनर एकमेकांच्या मागे उभे करून या दोन्हीही वाहनांचे चालक वाहनांच्या मधोमध जेवण करीत बसले होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आयशर ट्रकने उभ्या कंटेनरला जोराची धडक दिली. दोन्हीही कंटेनरच्या मधोमध जेवण करीत असलेला मोहंमद जावेद या चालकाचा दबून मृत्यू झाला. यावेळी आयशर चालकालाही गंभीर दुखापत होऊन तो जागीच गतप्राण झाला.

Accident News
Chhatrapati Sambhajinagar news | शेजाऱ्याची भिंत ठरली कर्दनकाळ; अख्ख कुटुंब दबलं, ११ वर्षांच्या मुलीचा बळी

या घटनेत अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. आयशर चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही. अपघातानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यातील दोघांनाही तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news