

Sambhajinagar police encounter accused in Ladda robbery case
वाळूज महानगर : पुढारी वृत्तसेवा
बजाजनगर येथील उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीचा गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.२७) मध्यरात्री नंतर एन्काऊंटर केला आहे. अमोल खोतकर (रा. पडेगाव) असे एन्काऊंटर मध्ये ठार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
१५ मे रोजी बजाजनगर येथील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणात सदर आरोपी हा दरोडा प्रकाणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
आरोपी अमोल हा वडगाव कोल्हाटी परिसरातील साई गार्डन लॉजिंग येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी वडगाव - साजापूर रोडवर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचला होता.
रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना संशयित कार येतांना दिसून आली. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र कारचालकाने कार न थांबवता कार पोलिसांच्या अंगावर घालण्याच प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर करून त्यास ठार केले. एन्काऊंटर कसा केला या विषयी वरिष्ट अधिकारी माहिती देतील असे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले आहे.