वाढदिवशीच काळाचा घाला : खदानीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली.
 17-Year-Old Youth Drowns in Quarry
वाढदिवशीच काळाचा घाला : खदानीत बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू file photo
Published on
Updated on

Tragedy Strikes on Birthday: 17-Year-Old Youth Drowns in Quarry

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणाचा खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.३१) मांडकी शिवार परिसरात घडली. आई-वडिलांना असलेला एकुलता एक मुलगा गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साईनाथ शिवाजी तुपे (रा. ब्रीजवाडी, चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 17-Year-Old Youth Drowns in Quarry
Electric Shock : चिंचा घेण्यासाठी झाडावर चढणे बेतले जीवावर

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ इयत्ता अकरावीमध्ये शिकत होता. त्याचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदर्निवाह करतात. साईनाथचा मंगळवारी वाढदिवस होता. दुपारच्या सुमारास तो आपल्या सहा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी जात असल्याचे आईला सांगून आनंदाने घराबाहेर पडला.

हे सर्व मित्र मांडकी (नारेगाव रोड) येथील एका खदाणीवर पोहण्यासाठी गेले. साईनाथला पोहता येत नव्हते, त्यामुळे तो थर्माकॉल शीटच्या आधारे पाण्यात शिरला. मात्र पोहता पोहता अचानक या शीटवरून त्याचा ताबा सुटला आणि तो खोल पाण्यात ओढल्या गेला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला.

 17-Year-Old Youth Drowns in Quarry
१८ वर्षीय तरुणीला हायवा चालकाने चिरडले

मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच सायंकाळी ६:१० वाजता मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी विनायक कदम, ड्यूटी अधिकारी हरिभाऊ घुगे, वैभव बाकडे आणि त्यांच्या पथकाने केवळ १५ मिनिटांत साईनाथला पाण्यातून बाहेर काढले.

मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला होता. चिकलठाणा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news