Pay and Park : पे अँड पार्कला व्यापारी महासंघातर्फे कडाडून विरोध

मनपाने खासगी टेंडर दिल्यामुळे मनमानी वसुलीचा धोका
Pay and Park
Pay and Park : पे अँड पार्कला व्यापारी महासंघातर्फे कडाडून विरोधfile photo
Published on: 
Updated on: 

Traders' association strongly opposes 'Pay and Park' scheme

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील मुख्य : बाजारपेठांमध्ये महापालिकेतर्फे प्रायोगिक तत्त्वावर खासगी संस्थेमार्फत 'पे अँड पार्क'च्या नावाखाली वाहनतळ शुल्क वसुली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता परस्पर सुरू करण्यात येत असलेल्या या वसुलीला जिल्हा व्यापारी महासंघाने कडाडून विरोध दर्शवला असून, या कामास तत्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

Pay and Park
Drug peddler : मांजावरील कारवाईने व्यवसाय ठप्प; पतंग विक्रेता बनला 'ड्रग पेडलर'

शहरात 'पे अँड पार्क' धोरण राबवण्याला व्यापारी महासंघाने सुरुवातीपासूनच विरोध आहे. असे असतानाही प्रशासनाने कोणतीही बैठक किंवा चर्चा न करता एकतर्फी आदेश काढून वसुली सुरू करण्याचे ठरवले आहे. पूर्वीच्या अनुभवांवरून खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून दादागिरी करून वसुली होण्याची भीती महासंघाने व्यक्त केली आहे.

त्यामुळे पालिकेच्या निर्णयाविरोधात शहरात तीव्र नाराजी आहे. यापूर्वी तत्कालीन मनपा आयुक्तांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी व्यापारी व प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत ग्राहकांकडून सरुवातीची १० मिनिटे कोणतेही पार्किंग शुल्क न आकारणे आणि व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या स्वतःच्या वाहनांकडून शुल्क न घेणे, अशा महत्त्वाच्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेतले होते. मात्र, आता विद्यमान प्रशासन या प्रकरणातून हात झटकत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे.

Pay and Park
Rainwater harvesting : प्रत्येक सरकारी, खासगी इमारतीवर रेन हार्वेस्टिंग बंधनकारक

मनमानी कारभार नको

शहरातील वाहतूक आणि पार्किंगला शिस्त लागणे आवश्यक असून, त्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, कोणतीही कार्यपद्धती स्पष्ट न करता आणि नागरिक व व्यापाऱ्यांना अंधारात ठेवून जुनेच टेंडर रेटून नेण्यास आमचा ठाम विरोध आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन या वसुलीला स्थगिती द्यावी आणि नागरिक व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.