Drug peddler : मांजावरील कारवाईने व्यवसाय ठप्प; पतंग विक्रेता बनला 'ड्रग पेडलर'

बुढीलाईनमध्ये एनडीपीएसची कारवाई; ३१ ग्रॅम एमडी, ९० नशेच्या गोळ्या जप्त
Drug peddler
Drug peddler : मांजावरील कारवाईने व्यवसाय ठप्प; पतंग विक्रेता बनला 'ड्रग पेडलर'file photo
Published on: 
Updated on: 

Crackdown on 'manja' brings business to a standstill; kite seller turns into a 'drug peddler'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुद्ध फास आवळल्याने पारंपरिक व्यवसाय ठप्प झालेल्या एका पतंग विक्रेत्याने झटपट पैशांच्या हव्यासापोटी चक्क अमली पदार्थांची तस्करी सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने (एनडीपीएस) बुढीलाईन परिसरात सापळा रचून या विक्रेत्याला रंगेहाथ अटक केली.

Drug peddler
Rainwater harvesting : प्रत्येक सरकारी, खासगी इमारतीवर रेन हार्वेस्टिंग बंधनकारक

आरोपीकडून ३१.६५ ग्रॅम एमडी पावडर, नायट्राझेपाम १० या नशेच्या ९० बटन गोळ्या, मोबाईल आणि स्कुटी असा २ लाख १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी दिली. अनिल गुलाबसिंग सूर्यवंशी (५३, रा. प्रकाश पतंग मार्ट, लोधेश्वर महादेव मंदिराजवळ, बुढीलाईन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहितीनुसार, बुढीलाईन भागात एक व्यक्ती दुचाकीवरून अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती एनडीपीएस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तत्काळ लोधेश्वर महादेव मंदिराजवळील 'प्रकाश मांजा मेकर' दकानासमोर सापळा रचून अनिल सूर्यवंशी याला ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर पोलिसांनी नायलॉन मांजाचा साठा असल्याच्या संशयावरून त्याच्या 'प्रकाश पतंग मार्ट' या दुकानाचीही कसून झडती घेतली; मात्र दुकानात कोणताही प्रतिबंधित मांजा आढळून आला नाही. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे, अंमलदार नारायण पायघन, भावसिंग चव्हाण, सतीश जाधव, विशाल मेटे, नितेश सुंदर्डे, सरताज पठाण, विठ्ठल पवार, तसेच औषधी निरीक्षक मनोज पैठणे आणि प्रीती क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

Drug peddler
Rainwater harvesting : प्रत्येक सरकारी, खासगी इमारतीवर रेन हार्वेस्टिंग बंधनकारक

ठराविक ग्राहकांना स्कुटीवरून डिलिव्हरी

अनिल सूर्यवंशी हा बुढीलाईन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पतंग आणि मांजा विक्रीचा व्यवसाय करतो. यापूर्वी त्याचावर हाणामारी आणि एक दंगलीचा गुन्हा आहे. मात्र, गेल्या काही काळापासून पोलिसांनी नायलॉन मांजाविरुद्ध धडक मोहीम उघडल्याने त्याचा व्यवसाय पूर्णपणे बसला होता. कमी वेळेत झटपट पैसा कमावण्यासाठी त्याने एमडी पावडर आणि नशेच्या गोळ्या विकण्याचा मार्ग निवडला.

आपल्या 'प्रकाश पतंग मार्ट' दुकानात ग्राहकांच्या नावाखाली तरुणांची ये-जा वाढल्यास पोलिसांना संशय येईल, अशी त्याला भीती होती. त्यामुळे तो दुकानात माल न ठेवता स्वतःच्या स्कुटीवरून (क्र. एम एच २० ई एम ७८६२) बुढीलाईन आणि आसपासच्या परिसरात फिरून ठराविक ग्राहकांना अमली पदार्थांची विक्री करत होता असे सूत्रांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.