

Today is Lakshmi Puja, preparations are in full swing at every household
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त शहरात हर्षोल्हासाचे वातावरण असून, आज मंगळवारी (दि.२१) घरोघरी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजनाची तयारी करण्यात आली आहे. तत्पूर्वी यानिमित्त पूजेचे साहित्य, चोपडी, फुले, कपडे यासह विविध वस्तू खरेदीसाठी सोमवारी (दि. २०) शहरातील बाजारपेठांमध्ये तोबा गर्दी झाली. येथील फटाका मार्केटमध्येही रात्री उशिरापर्यंत गर्दीचे चित्र होते.
अतिवृष्टीने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे व्यापाऱ्यांनाही दसऱ्याला याचा फटका बसला होता. त्यामुळे दिवाळीत चांगल्या व्यवसायाच्या आशेने व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली. दरम्यान शासनाकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आणि कामगारवर्गाला बोनस मिळाल्याने बाजारपेठेला उभारी मिळाली. धनत्रयोद शीपासून ग्राहक खरेदीसाठी निघाल्याने बाज ारपेठात गर्दी होत आहे. मंगळवारी लक्ष्मीपूजन असल्याने आदल्या दिवशी म्हणजेच, सोमवारी बाजारात ग्राहकांची तोबा गर्दी झाली. लक्ष्मीपूजनासाठी लागणारे लाह्या, बत्तासे, बोळखे, फुले व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच लगबग सुरू होती.
त्यामुळे औरंगपुरा, निराला बाजार, कुंभारवाडा, मच्छली खडक, केळीबाजार, सुपारी हनुमान रोड, गुलमंडी चौकासह विविध भागांतील बाजारपेठातील रस्ते ग्राहकांच्या गर्दीन बहरून गेली. व्यवसायाचा लेखामांडणी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी नवीन चोपडी खरेदी केल्या. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंख्येला उशिरापर्यंत बाज- ारात कपडे, गृहउपयोगी साहित्य, फराळ यासह विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली होती