

Chhatrapati Sambhajinagar City's water supply is smooth
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा ऐन दिवाळीत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मिमी व ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या फुटल्या. त्यामुळे शहरातील काही भागांना उशिराने पाणीपुरवठा झाला. मात्र महापालिका पाणीपुरवठा विभागाने तातडीने जलवाहिनींची दुरुस्ती केल्याने टंचाईचे संकट टळले.
शहराला सध्या जुन्या जीर्ण झालेल्या ७००, १२०० मिमीसह नव्या नऊशेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत आहे. या तिन्ही जलवाहिन्यांतून शहरात दररोज १७१ एमएलडी पाणी दाखल होत आहे. मागील सहा महिन्यांपासून जलवाहिन्या फुटण्याचे सत्र कमी झाले आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. ९०० च्या जलवाहिनीतून शहराला सुमारे ४२ एमएलडीच्या जवळपास पाणीपुरवठा होत आहे.
त्यामुळे शहराच्या विविध वसाहतींतील पाण्याचे गॅपही कमी झाले आहेत. परंतु ऐन दिवाळीतच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीर्ण ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी दोन दिवसांपूर्वी फारोळा जलशुद्धकरण केंद्राजवळ फुटली. त्यामुळे पाणीप रवठा संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र महापालिका पाणीपुरवठा विभागाने शर्तीचे प्रयत्न करून ही जलवाहिनी दुरुस्त केली. त्यामुळे ऐन दिवाळीत पाणीबाणीची समस्या टळली.