Sambhajinagar News : दिवाळीत माझ्या मुलाला आता फटाक्यांचे आवाज ऐकू येतील

पोलिस आयुक्तांना एक मेसेज अन् हरवलेली बॅग परत; आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
Sambhajinagar News
Sambhajinagar News : दिवाळीत माझ्या मुलाला आता फटाक्यांचे आवाज ऐकू येतील File Photo
Published on
Updated on

My child will now be able to hear the sounds of crackers on Diwali.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज येथून तीन वर्षांच्या चिमुकल्याला स्पीच थेरपीसाठी समर्थनगर येथे आणलेल्या आईची ६ लाखांचे हेरिंग एड मशीन, मोबाईल आणि रोकड असलेली बॅग शनिवारी (दि.१८) रिक्षात विसरली होती. त्या चिमुकल्याला मशीनशिवाय ऐकू येत नाही. आईने ती बॅग हरवल्याचे लक्षात येताच तिचा जीवच कासावीस झाला. अखेर तिने थेट पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना व्हॉट्सअॅप संदेश करून मदत मागितली आणि आयुक्तांनी तात्काळ दखल घेत गुन्हे शाखेला आदेश दिले. त्यानंतर अवघ्या तासाभरात बॅग परत मिळवून दिली.

Sambhajinagar News
Parbhani Crime News : विद्यार्थ्याचे अपहरण करीत बेदम मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फिर्यादी प्रिया विक्रांत वानखेडे (२४, रा. बजाजनगर, मूळ अकोला) या शनिवारी दुपारी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला स्पीच थेरपीसाठी वाळूज येथून समर्थनगर येथे घेऊन आल्या होत्या. घाईत त्यांची बॅग रिक्षात राहून गेली. बॅगमध्ये त्यांच्या मुलाचे ६ लाखांचे हेरिंग एड मशीन, २१ हजार रुपयांचा मोबाईल आणि एक हजाराची रोकड होती. बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्या व्याकुळ झाल्या. कारण त्या मशीनशिवाय मुलाला जग ऐकू येत नाही. दुसऱ्या दिवशी (रविवारी) प्रिया यांनी थेट पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना व्हॉट्सअॅपवर संदेश करून घटना सांगितली.

माझ्या मुलाचे ऐकण्याचे मशीन हरवले आहे, कृपया मदत करा, असा संदेश पाठवला. त्यात घडलेल्या घटनेचे वर्णन केले. त्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांना बॅग शोधून काढण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे, अंमलदार सिद्धार्थ थोरात, विजय घुगे आणि यशवंत गोबाडे यांच्या पथकाने बॅग शोधून काढली.

Sambhajinagar News
NCP : राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळी दिवाळी साजरी

आभार मानले. दरम्यान पोलिसांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे उमेश महापुरे, सुमित वानखेडे, विलास गवळी, पंडित शिंदे यांनी पोलिस आयुक्त प्रवणी पवार व नंदलाल कुचे यांचा कार्यालयात जावून त्यांचे स्वागत करुन

दिवाळीची भेट मिळाली

बॅग हातात घेताच प्रिया यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गुन्हे शाखेच्या पथकामुळे माझ्या मुलाचे ऐकण्याचे मशीन परत मिळाले. आता दिवाळीत माझ्या मुलाला फटाक्यांचे आवाज ऐकू येतील. मुलाचा हसरा चेहरा पाहणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठी भेटवस्तू आहे, असे सांगत त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news