Tiranga Rally : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅली

मंत्री अतुल सावेंनी केली मार्गाची पाहणी, सहभागी नागरिकांच्या सोयीसुविधांवर लक्ष
Tiranga Rally
Tiranga Rally : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅलीfile photo
Published on
Updated on

Tiranga Rally today in the presence of the Chief Minister

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या तिरंगा रॅली आज होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, या रॅली मार्गाची पाहणी करून सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधांबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी (दि. १३) दिली.

Tiranga Rally
Sambhajinagar News : २१८ कोटींची मागणी, जिल्ह्याच्या वाट्याला अवघे ५.७५ कोटी

यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. देशाच्या एकात्मतेसाठी देशभक्त, देशप्रमी नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणार आहे.

ही रॅली आज (दि. १४) दुपारी २ वाजता महात्मा फुले चौकहून क्रांती चौकाच्या दिशेने निघणार आहे. या भव्य तिरंगा यात्रेत मराठवाड्यासह जाळगाव व इतर जिल्ह्यांतून मोठ्याप्रमाणात देशप्रेमी हजेरी लावणार असल्याचेही मंत्री सावे म्हणाले. त्या अनुषंगाने मंत्री सावे यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत तिरंगा रॅली मार्गाची पाहणी केली.

या पाहणीत त्यांनी कार्यक्रमस्थळ आणि रॅली मार्गावर वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि रॅलीत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सोयीसुविधांबाबत काही सूचनाही दिल्या. दरम्यान, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही मंत्री सावे यांनी केले आहे.

Tiranga Rally
Water New Scheme : नवीन योजनेचे पाणी दाखल, नळ कोरडेच

युवावर्ग मोठ्या संख्येत

या भव्य तिरंगा यात्रेत शहरातील सुमारे सर्वच महाविद्यालयांतून तरुण, तरुणी हजेरी लावणार आहेत. त्यासोबतच कोचिंग क्लासेसमधूनही तरुणांनी यात्रेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे युवा वर्ग, नागरिक, कार्यकर्ते व देशप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंधेलाच शहर तिरंगामय होऊन देशभक्तीचे वातावरण निर्माण होणार असल्याचेही मंत्री अतुल सावे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news