Sambhajinagar Crime News : चाकू हल्ला प्रकरणातील तिघे जेरबंद

बजाजनगरात भोलानाथवर गोळीबारचा प्रयत्न फसला; आरोपींना पाच दिवसांची कोठडी
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : चाकू हल्ला प्रकरणातील तिघे जेरबंद File Photo
Published on
Updated on

Three arrested in knife attack case

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा

बजाजनगरात पैशाच्या कारणावरून पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न फसल्याने एकावर चाकू व खंजीराने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.२४) मध्यरात्रीनंतर शहरातून अटक केली. योगेश नंदू सांगळे (३० रा. गट क्रमांक ६ स्वस्तिक सिटी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर), सागर भागवत भारस्कर (२७ रा. गल्ली नंबर-६, जाधववाडी छत्रपती संभाजीनगर) व राज संजय बर्फे (२० रा. फुलेनगर, पंढरपूर) अशी पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे असून भोलानाथ शामराव कडमिंचे (३२ रा. बडगाव को.) हा जखमी झाला आहे.

Sambhajinagar Crime News
Teacher- Student Emotions : शिक्षकांची बदली झाल्यावर विद्यार्थी इतके भावनिक का होऊ लागलेत?

याविषयी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सागर भारस्कर याचे भोलानाथ कडमिंचे याच्याकडे सहा लाख रुपये आहेत. सागर भारस्कर, योगेश सांगळे व त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भोलानाथ यास त्याच्या घरातून धुळे-सोलापूर महामार्गावरील एका पानटपरीवर घेऊन गेले. त्याठिकाणी सागर भारस्कर याने भोलानाथ यास पैसे आजच मिळाले पाहिजे नाहीतर तुला पाहून घेतो अशी धमकी दिल्याचे भोलानाथ याने त्याचा मित्र अजय इसटक्के यास फोन करून सांगितले होते.

त्यानंतर सायंकाळी बजाजनगरातील शिवराणा चौकात भोलानाथ, अजय यांनी अमेर पठाण यास बोलावून घेत सदरील प्रकरण मिटविण्यास सांगितले होते. दरम्यान अमेर पठाण याने योगेश यास आपसात चर्चा करून हे प्रकरण मिटवून घेऊ असे फोन केला होता. यावर योगेश याने ठिक आहे असे म्हणून त्यांना बजाजनगरातील एच पी गॅस एजन्सी जवळ येण्यास सांगून रात्री सव्वा आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहनातून योगेश सांगळे व त्याच्या सोबत दोघे जण भोलानाथ यांच्याजवळ आले.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Rain : पावसामुळे आतापर्यंत ८६ जणांचा मृत्यू

यावेळी योगेश सांगळे याने भोलानाथला का रे तू माजलास का असे म्हणाला. तेव्हा त्याने माझा व सागर भारस्कर याचा पैशाचा व्यवहार आहे त्यात तुझा काय संबंध असे म्हणताच योगेश याने त्याच्या जवळील पिस्टल दोन्ही हाताने धरून ती भोलानाथ याच्याकडे रोखली. यावेळी भोलानाथ याने बचावासाठी त्यास विरोध केल्याने या झटापटीत पिस्टलमधील मॅगझीन खाली पडली. यामुळे योगेशला गोळी झाडता आली नाही.

दरम्यान योगेश सोबत असलेल्या दोघांनी खंजीर व चाकूने भोलानाथ याच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी अवस्थेत भोलानाथ याने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली होती. प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या फरार आरोपींना अटक करण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली होती.

आरोपींना ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

भोलानाथ याच्यावर प्राणघातक हल्ला करून योगेश सांगळे, सागर भारस्कर, राज बर्फे हे फरार झाले होते. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, विशाल बोडखे, संदीप शिंदे, जमादार नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, विजय निकम, सुनील जाधव, पोलिस अंमलदार सुनील जाधव, प्रमोद सुरासे सोमकांत भालेराव, बाळू नागरे, सोमनाथ दुकले आदींच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री नंतर या गुन्ह्यातील फरार आरोपींना शहरातील वेगवेगळ्या भागातून जेरबंद केले. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी या आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे तपासी अधिकारी अरविंद शिंदे यांनी सांगितले.

योगेश सांगळेवर गंभीर गुन्हे

आरोपी योगेश सांगळे हा रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खून, जातीय तेढ निर्माण करणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे, मारहाण करणे तसेच पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ एडिट करून खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पोलिसांची बदनामी करणे अशा स्वरूपाचे. तर फुलंब्री पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुन्हेगारी वाढली

गेल्या काही दिवसांपासून बजाजनगरसह वाळूज महानगर परिसरात भाई, दादांचा धुडगूस वाढला आहे. खुले आम रस्त्यावर चाकू हल्ला, लूटमार, चैन स्कॅचिंग आदी घटना वाढल्या आहेत. मात्र पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने या भाई, दादांची गुंडगिरी वाढत आहे. वाढते अवैध धंदे व नशेखोली यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. नागरिकांमध्ये भाई, दादांची पसरलेली दहशत मोडीत काढणे आणि निर्भय वातावरण प्रस्थापित करणे पोलिसांपुढे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news