

Threatening language to MLA Bamb, demand to register a case
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर खुलताबादचे आ. प्रशांत बंब यांच्यावर सोशल मीडियावर अवमानकारक व धमकीची भाषा वापरणाऱ्या अमरावतीतील व्यक्तीविरुध्द तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गंगापूर पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमारसिंग राठोड यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक टीईटी प्रकरणात आमदार बंब यांच्या व्हिडिओला टॅग करून भोयर यांनी काळे फासण्याचा उल्लेख करत अवमानकारक, अश्लील व धमकीची भाषा वापरली. या वक्तव्यामुळे आमदार बंब यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे नमूद करत कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
५ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे टीईटी परीक्षा रद्द करण्यासाठी शिक्षक संघटनांनी मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर लासूरस्टेशन येथे माध्यमांशी संवाद साधताना आमदार बंब म्हणाले होते ङ्गङ्घजवळपास ७० टक्के शिक्षक लाडावलेले आहेत. त्यांनी केलेल्या संपावर केवळ वेतनकपात नव्हे तर सस्पेंशनचाही आदेश काढला पाहिजे.
या विधानाला गंगापूर खुलताबाद तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सोशल मीडियावर आमदारांविषयी वापरलेली घोर अवमानकारक भाषा असहनीय असल्याचे नमूद करत, याप्रश्री गुन्हा दाखल करावा व सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी निवेदन देताना माजी नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, आनंद पाटील, कृष्णकांत व्यवहारे, राकेश कळसकर, दीपक साळवे, अतुल रासकर, प्रशांत मुळे, रामेश्वर पाटील, अनिल चव्हाण, नंदू सजगुरे, राजेंद्र राठोड, आशीर्वाद रोडगे, गौरव तांगडे, मनोज गायकवाड, संदीप बोजवारे, प्रकाश खाजेकर, तोफिक शहा, गणेश पाटील, रावसाहेब नाबदे, सलमान शेख, संतोष गायकवाड, बंटी पाटील, वैभव धनायत, कल्याण शिंदे, योगेश चव्हाण, ओम कारभार, शिवराज दारुंटे, गोपीचंद जाधव, नंदू पाटील, अशोक पाटील, बापू खाजेकर, रफिक दादा, संदीप आळंजकर यांसह भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.