Onion prices fall : कांद्याला भाव नाही; शेतकऱ्यांची निराशा!

बांगलादेशाच्या आयात बंदीमुळे कांदा उत्पादक संकटात
 Onion News
Onion Price DropFile Photo
Published on
Updated on

There is no price for onions; Farmers are disappointed!

शुभम चव्हाण

छत्रपती संभाजीनगर: निसर्गाचा लहरीपणा, सरकारच्या बेहिशेबी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच अडचणीत येतो. त्यातच आगीत तेल ओतल्याप्रमाणे मागील तीन महिन्यांपासून बांगलादेशकडून होणाऱ्या आयातबंदीमुळे देशातील कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. याचाच फटका जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. साठवलेला कांदा विकला तर तोटा, ठेवला तर सडण्याची शक्यता असल्याने इकडे आड तिकडे विहीर, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे.

 Onion News
Manoj Jarange : नेत्यांची हुजरेगिरी सोडा; मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्या

कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सध्या ठोक बाजारात कांदा ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे, तर किरकोळ बाज-ारात १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते. मात्र हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मतानुसार, कांद्याची निर्यात धोरणात शाश्वत आवश्वक आहे. नाही तर बेभाव ही समस्या कायम राहील. तसेच कांद्याचे दर सुधारण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या केल्या नाहीत तर सरकार विरोधात जोरदार आवाज उठवणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे.

केंद्राकडे पाठपुरावा करावा

66 सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीला, केंद्र सरकारचे शेतकरी हिताचे नसलेले निर्यात धोरण जबाबदार आहे. कांद्याचे दर वाढले की, ग्राहकांसाठी ते कमी करण्यासाठी सरकार अॅक्शन मोडवर येते. त्याचप्रमाणे कमी झाले की, शेतकऱ्यांसाठी सरकार गप्प बसते. त्यामुळे ग्राहकांच्या हिताप्रमाणे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा आणि सरकार व विरोधी पक्षानेही जास्तीत जास्त कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा.

 Onion News
Sambhajinagar News : विवाहितेच्या शरीरातील ट्यूब परस्पर काढली, मातृत्वाचा हक्क गमावला

मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो !

कांद्याच्या भावात वाढ होऊन दोन पैसे पदरात 66 पडतील, या आशेने आम्ही कांदा उत्पादन आणि साठवणुकीसाठी खर्च केला. मात्र सध्या भाव नसल्याने कांदा विकता येत नाही. सडत असल्याने जास्त दिवस साठवूण ठेवू शकत नाही. त्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो आहे.
रितेश गायकवाड, कांदा उत्पादक शेतकरी.

सरकारने तात्काळ उपयोजना कराव्यात

सध्या स्थानिक बाजारात कांद्याचे दर ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल इतके घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या नफा मिळवण्याच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. काही ठिकाणी कांदा ५०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. त्यामुळे सरकारने यावर तात्काळ उपयोजना करणे गरजेच्या असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news