Sambhajinagar Crime News : व्यावसायिक स्पर्धकाकडून बँक खात्याच्या गोपनीय माहितीची चोरी

बायोकोल उद्योजकाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : व्यावसायिक स्पर्धकाकडून बँक खात्याच्या गोपनीय माहितीची चोरीFile Photo
Published on
Updated on

Theft of confidential bank account information from a business competitor

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : व्यवसायातील स्पर्धेपोटी एका उद्योजकाने दुसऱ्या उद्योजकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून त्याला मोठे आर्थिक नुकसान पोहोचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साई अॅग्रो इंडस्ट्रीजचे मालक सुरेश धोंडीबा गवळी (५५) यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अमोल ला यांच्यावर आपल्या अज्ञानाचा फायदा घेत कंपनीच्या आयसीआयसीआय बँक खात्याशी स्वतःचा अनधिकृतपणे ईमेल आयडी जोडून गोपनीय माहिती चोरल्याची तक्रार केली आहे. गवळी यांच्या जबाबावरून, सायबर पोलिसांनी अमोल लड्ढा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२), ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Sambhajinagar Crime News
Vasmat Election Postponed : वसमत, फुलंब्रीची संपूर्ण निवडणूकच लांबणीवर

सुरेश गवळी हे वाळूज येथील बजाजनगर परिसरात राहतात आणि साई अॅग्रो इंडस्ट्रीज नावाची त्यांची बायोकोल कंपनी आहे. सन २०१० पासून ते युनायटेड ब्रेवरेज, वाळूज येथील प्लांटला बायोकोल पुरवतात. मार्च २०२५ मध्ये युनायटेड ब्रेवरेज कंपनीचे ऑडिटर प्रतिक मेहता यांनी गवळी यांना त्यांच्या कंपनीचे गोपनीय बैंक स्टेटमेंट आणि मशीनरीचे फोटो दाखवले. ही गोपनीय माहिती ऑडिटरकडे कशी आली, हे गवळी यांना कळेना. त्यांनी ऑडिटर मेहता यांना ईमेलद्वारे विचारणा केली असता, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती मिळाल्याचे सांगितले.

गवळी यांनी बँकेत चौकशी केली, तेव्हा त्यांच्या बँक खात्याशी त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीसोबत अमोल लड्न नावाने दुसरा ईमेल आयडीही नोंदणीकृत असल्याचे उघड झाले. या दोन्ही ईमेलवर खात्यासंबंधी सर्व माहिती बँकेकडून नियमितपणे पाठवली जात होती. गवळी यांनी आणि त्यांचे अकाउंटंट प्रदीप उगले यांनी हा ईमेल आयडी कधीही रजिस्टर केला नव्हता. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हा ईमेल आयडी गवळी यांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी अमोल लड्न यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सुरेश गवळी यांनी २२ एप्रिल रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता आणि सप्टेंबर २०२५ मध्ये अधिक माहिती सादर केली होती. पोलिस तपासानंतर लड्डा विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून, सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव तपास करत आहेत.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : फुकटात जेवण न दिल्याने हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला

लड्डाने घेतला अज्ञानाचा फायदा

गवळी यांना संगणक, ऑनलाईन बँकिंग आणि इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत लड्न यांनी त्यांचा ईमेल आयडी अनधिकृतपणे रजिस्टर केला. यामुळे लड्डन यांना गवळी यांच्या कंपनीचे मालाचे दर आणि विक्रीचे गोपनीय रेट सहज मिळत गेले. या माहितीचा वापर करून त्यांनी गवळी यांच्या व्यवसायातील ऑर्डर्स स्वतःकडे वळवल्या, ज्यामुळे गवळी यांचे मोठे आर्थिक नुकसान आणि फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news