City Bus Accident : धावत्या स्मार्ट सिटी बसचे चाक निखळले; दुचाकीला धडकल्याने एकजण गंभीर जखमी

दौलताबाद घाटातील घटना : जखमीवर घाटीत उपचार सुरू
City Bus Accident
City Bus Accident : धावत्या स्मार्ट सिटी बसचे चाक निखळले; दुचाकीला धडकल्याने एकजण गंभीर जखमीfile photo
Published on
Updated on

The wheel of a running smart city bus came off; One person seriously injured after hitting a bike

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: स्मार्ट सिटी बसच्या दुरवस्थेचा आणखी एक धक्कादायक प्रकार सोमवारी (७सप्टेंबर) उघडकीस आला. वेरूळहून शहराकडे येणाऱ्या धावत्या स्मार्ट सिटी बसचे समोरचे उजवे चाक दौलताबाद घाटात अचानक निखळून थेट एका दुचाकीस्वाराला धडकले. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, मनपाच्या बसेसच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

City Bus Accident
Ganeshotsav 2026 : धर्मादायकडे २३२ गणेश मंडळांची नोंदणी

नदीम नजीर शेख (४९, रा. जहांगीरदार कॉलनी, रेल्वे स्टेशन परिसर) असे या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेरूळहून छत्रपती संभाजीनगरकडे प्रवाशांना घेऊन येणारी मनपाची स्मार्ट सिटी बस दौलताबाद घाटातून वन विभागाच्या कार्यालयासमोरून) जात होती. गाडी वेगात असताना अचानक बसचे समोरचे उजव्या बाजूचे चाक निखळून बाहेर आले.

याच वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नदीम शेख यांच्या दुचाकीला या चाकाने जोराची धडक दिली. ही धडक एवढी भयंकर होती की, नदीम शेख हे दुचाकीसह खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या हात आणि पायाला गंभीर फॅक्चर झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन खंडागळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सिटी बसेसच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

काही दिवसांपूर्वीच आमखास मैदानाजवळ एका स्मार्ट सिटी बसचा पाटा तुटल्याने थेट क्षयरोग रुग्णालयाच्या भिंतीला जवळ जाऊन थांबली होती. आता धावत्या बसचे चाक निखळल्याने स्मार्ट सिटी बसेसच्या देखभाल-दुरुस्तीची दुरवस्था चव्हाट्यावर आली आहे. प्रवाशांचा जीव या बसेसमध्ये खरंच सुरक्षित आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे-

City Bus Accident
Marathwada : मराठवाड्याच्या उद्योजकतेला जागतिक पंख !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news