Ganeshotsav 2026 : धर्मादायकडे २३२ गणेश मंडळांची नोंदणी

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सारख्या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर वर्गणी संकलनासाठी धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
Ganpati Festival
Ganpati FestivalPudhari
Published on
Updated on

232 Ganesh Mandals registered with the Charity Commissioner's office

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सारख्या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर वर्गणी संकलनासाठी धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आल्याने गणेश मंडळांची नोंदणीसाठी धर्मदाय कार्यालयात गर्दी होत आहे. आतापर्यंत २३२ हून अधिक मंडळांनी नोंदणी करून परवानगी घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Ganpati Festival
Marathwada : मराठवाड्यात धरण, तलावांचे पाणी पिण्यासाठी राखीव

दहीहंडीनंतर अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांकडून जय्यत तयारी सुरु असून, विविध परवानगीसाठी मनपा, पोलिस प्रशासनाकडे गर्दी होत आहे. यासह धर्मादाय कार्यालयातही नोंदणी करुन अधिकृत परवानगीसाठी मंडळांची धावपळ सुरू आहे. दररोज ३५ ते ४० मंडळे परवानगीसाठी अर्ज करत असून अधिकाऱ्यांकडून त्यांची तत्काळ पडताळणी केली जात आहे.

अवघ्या काही दिवसांत २३२ पेक्षा जास्त मंडळांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून अधिकृत परवानगी घेतली आहे. उत्सवाच्या काळात कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व लहान-मोठ्या मंडळांनी त्वरित नोंदणी करून परवानगीनंतरच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ganpati Festival
Crime News : महिलांना कामावरून काढल्याने हेड पोस्ट ऑफिसमध्ये राडा

कारवाईचा इशारा

धर्मादाय सहआयुक्त नितीन जाधव यांनी स्पष्ट केले की, धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता सार्वजनिक निधी किंवा वर्गणी गोळा करणे बेकायदेशीर आहे. अशा मंडळांवर कलम ६६ (क) नुसार ३ महिन्यांचा साधा कारावास व विनापरवानगी जमा केलेल्या रकमेच्या दीड पट दंड केला जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news