Marathwada : मराठवाड्याच्या उद्योजकतेला जागतिक पंख !

संभाजीनगरात 'टाय' चॅप्टरची सुरुवात, पहिल्याच दिवशी ५० उद्योजक जोडले
Sambhajinagar entrepreneurs
Marathwada : मराठवाड्याच्या उद्योजकतेला जागतिक पंख !file photo
Published on
Updated on

Start of 'TIE' chapter in Sambhajinagar, 50 entrepreneurs added on first day

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्यातील उद्योजकता, उद्योग आणि स्टार्टअप परिसंस्थेला जागतिक पातळीवर जोडणाऱ्या टाय छत्रपती संभाजीनगर (टाय सीएसएन) चे शनिवारी औपचारिक उद्घाटन करण्यात आले. स्थानिक उद्योजकांना जागतिक संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या नव्या अध्यायाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी जवळपास ५० सदस्य जोडले गेले आहे.

Sambhajinagar entrepreneurs
Sambhajinagar Crime News : दारूसाठी पैसे न दिल्याने दिव्यांग भिक्षेकऱ्याची टीव्ही सेंटरवर वॉकरने डोके ठेचून निर्घृण हत्या

टाय सीएसएन हा टाय पुणेच्या मार्गदर्शनाखाली 'हब-अँड-स्पोक' पद्धतीने कार्य करणार आहे. या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना मार्गदर्शन, शिक्षण, व्यावसायिक संपर्क, इनक्युबेशन, निधी आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होणार आहेत. संभाजीनगर टायचे जगातील ६६वे चॅप्टर असून, भारतातील ३३वे आहेत. टायच्या जागतिक नेटवर्कमध्ये १४ देशांमध्ये ५,००० चार्टर सदस्य आणि १२,००० हून अधिक सदस्य आहेत.

या जागतिक नेटवर्कचा लाभ आता संभाजीनगरमधील उद्योजकांना मिळणार आहे. स्थानिक गरजा आणि उद्योगांनुसार स्वतंत्र स्थानिक मार्गदर्शकांचे जाळे उभारण्यावरही भर देण्यात येणार आहे. तसेच संस्थात्मक कारभार, नियमांचे पालन दस्तऐवजीकरण, उत्तराधिकार नियोजन आणि पुढील पिढीचे नेतृत्व विकसित करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. उद्घाटनाला ऋषी कुमार बागला, राहुल धूत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी टाय ग्लोबलचे प्रतिनिधी कमल अग्रवाल, टाय पुणेचे अध्यक्ष अजय भागवत, तसेच उद्योजक, पदाधिकारी आणि चार्टर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धूत ट्रान्समिशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील संघर्ष आणि व्यवसाय विस्ताराचे कथन करताना संभाजीनगरमधून जागतिक दर्जाची कंपनी उभारता येते, हे उदाहरणातून स्पष्ट केले. २००० मध्ये अत्यंत मर्यादित भांडवल, दोन एकर जमीन, लहान उत्पादन सुविधा आणि अवघ्या १५ कर्मचाऱ्यांसह सुरू झालेल्या व्यवसायाने आज मोठ्या औद्योगिक समूहाचे रूप घेतले आहे.

Sambhajinagar entrepreneurs
Ganeshotsav 2026 : धर्मादायकडे २३२ गणेश मंडळांची नोंदणी

स्थानिक उद्योगातून जागतिक व्यवसायाकडे

छत्रपती संभाजीनगरमधील पारंपरिक उद्योग, पहिल्या पिढीतील उद्योजक, युवा स्टार्टअप संस्थापक, तंत्रज्ञान क्षेत्र, प्रतिभावान मनुष्यबळ आणि शैक्षणिक संस्थांना जागतिक उद्योजकीय परिसंस्थेशी जोडण्याचे उद्दिष्ट टाय सीएसएनने ठेवले आहे. व्यवसाय संभाजीनगरमध्ये उभा करायचा आणि तो जगभर विस्तारायचा हा या अध्यायाच्या वाटचालीचा मुख्य विचार राहणार आहे.

टाय ग्लोबल समिट संभाजीनगरमध्ये

टाय पुणेच्या माध्यमातून टाय सीएसएनला विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. टायकोन पुणे, 'नर्चर' आणि इतर राष्ट्रीय व जागतिक कार्यक्रमांमध्ये संभाजीनगरमधील उद्योजकांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. भविष्यात टाय ग्लोबल समिट संभाजीनगरमध्ये आयोजित करण्याची महत्त्वाकांक्षाही व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news