MASIA Expo : मसिआ एक्सपोला केंद्रीय अर्थमंत्री, उद्योगमंत्री येणार

देश-विदेशांतील १४०० कंपन्यांची बुकिंग, स्टॉल उभारणीच्या कामांना वेग
MASIA Expo News
MASIA Expo : मसिआ एक्सपोला केंद्रीय अर्थमंत्री, उद्योगमंत्री येणारFile Photo
Published on
Updated on

The Union Finance Minister and the Industry Minister will be attending the MASIA Expo.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : नववर्षी जानेवारी महिन्यात मसिआच्या वतीने ऑरिक सिटी येथे आयोजिक महाएक्पोसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत. यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी येण्यास सहमती दिल्याची माहिती मसिआ अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली.

MASIA Expo News
गंगाखेडमध्ये कॅफे हाऊसच्या नावाखाली अश्लील चाळे

दरम्यान, एक्सपोसाठी स्टॉल उभारणीच्या कामास वेग आला असून, १५२८ पैकी सुमारे १४०० हून अधिक स्टॉल बुकिंग झाले आहेत, असेही गायकवाड म्हणाले. मराठवाड्यातील लघुउद्योगांना व्यवसायाच्या संधी आणि उद्योजकांना नवनवीन उत्पादने, तंत्रज्ञान, इत्यादींची माहिती मिळावी यासाठी मसिआ (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर) दर तीन वर्षांनी औद्योगिक प्रदर्शन आयोजित करीत असते.

यंदा ८ जानेवारी २०२६ पासून ऑरिक सिटीच्या ५७.५ एकर जागेत होणाऱ्या या औद्योगिक प्रदर्शनासाठी ८ मोठे हॉल आणि त्यामध्ये एकूण १५०० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. नियोजित जागेची स्वच्छता आणि लेव्हल करण्याचे काम पूर्ण झाले असून, प्रदर्शनासाठी भव्य डोम उभारणीसाठी मसिआ सभासद उद्य-ोजक रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. अनेक जण प्रत्यक्ष भेट देत या तयारीचा आढावा घेत आहेत.

MASIA Expo News
Beef smuggling Paithan| पैठण-बालानगर परिसरात पोलिसांचा छापा; गोवंश कत्तलप्रकरणी ६ जणांवर कारवाई, २१५ किलो मांस जप्त

सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार असल्याने याचा उद्योजक व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मसिआचे अध्यक्ष गायकवाड, संयोजक अनिल पाटील व चेतन राऊत यांनी केले आहे. यावेळी कार्यकारिणी सदस्य राहुल मोगले, मनीष अग्रवाल, सचिन गायके, दिलीप चौधरी, राजेंद्र चौधरी, प्रल्हाद गायकवाड, सुरेश खिल्लारे, दुष्यंत आठवले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news