CCTV camera : शहरात आता 'तिसऱ्या डोळ्या'ची करडी नजर

बँक, हॉटेल, मॉल्ससह २३ प्रकारच्या आस्थापनांना नियम लागू, पोलिस आयुक्त पवार यांचे आदेश
CCTV Camera
CCTV CameraPudhari
Published on
Updated on

The 'third eye' now keeps a stern watch over the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात वाढती गुन्हेगारी उघडकीस आणणे आणि नागरिकांसह महिला व बालकांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी आस्थापनांच्या परिसरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व खासगी आस्थापनांना ५० मीटरपर्यंतचे दृश्य कव्हर करणारे 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

CCTV Camera
Sambhajinagar Helmet Rule : शहरवासीयांच्या मानगुटीवर पुन्हा हेल्मेटचे भूत

राज्य शासनाच्या 'एक कॅमेरा शहरासाठी सर्वांच्या सुरक्षेसाठी' या उपक्रमांतर्गत ही महत्त्वपूर्ण अधिसूचना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये जारी करण्यात आली आहे. अनेकदा खासगी आस्थापनांच्या बाहेर गुन्हे घडतात, मात्र कॅमेऱ्यांची दिशा योग्य नसल्याने किंवा रेकॉर्डिंग क्षमता नसल्याने पोलिसांना तपासात अनेक अडचणी येतात आणि पुराव्याअभावी गुन्हेगार सुटतात.

या पार्श्वभूमीवर भविष्यात गुन्हेगारांविरुद्ध भक्कम वैज्ञानिक पुरावे उमे करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या आस्थापनांना नियम लागू बँका, एटीएम, दागिन्यांची दुकाने, हॉटेल्स, गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट्स, बार व पब, वाईन शॉप्स, निवासी टॉवर्स, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स, जिम, चित्रपटगृहे, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि रुग्णालये अशा एकूण २३ प्रकारच्या खासगी आस्थापनांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

CCTV Camera
Drug Smugglers : अखेर ड्रग्ज तस्करांना घरे पाडण्याच्या नोटीस

असे आहेत सीसीटीव्ही सक्तीचे नियम :

५० मीटर कव्हरेजः कॅमेऱ्यांची दिशा अशी असावी की, आस्थापनेच्या सीमारेषेपासून ५० मीटरपर्यंतचा परिसर रेकॉर्ड होईल.

२४ तास नजरः बसविण्यात आलेली सीसीटीव्ही प्रणाली २४ तास सुरू असली पाहिजे. १५ दिवसांचे रेकॉर्डिंगः कॅमेऱ्यांची गुणवत्ता दर्जेदार असावी आणि किमान १५ दिवसांचे फुटेज साठवून ठेवण्याची क्षमता असावी.

पोलिसांना सहकार्यः पोलिसांच्या मागणीनुसार तत्काळ सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. तसेच काही संशयास्पद हालचाली दिसल्यास जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती द्यावी.

नागरिकांची सुरक्षा आमची सर्वोच्च प्राथमिकता शहरातील नागरिकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अनेकदा गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने तपासात मोठे अडथळे येतात. या नवीन अधिसूचनेमुळे आस्थापनांच्या परिसरातील ५० मीटर अंतरापर्यंतचे रेकॉर्डिंग उपलब्ध होईल, ज्यामुळे गुन्हेगारांवर वचक राहील आणि पोलिसांना भक्कम वैज्ञानिक पुरावे मिळतील. शहरवासीयांनी आणि सर्व व्यावसायिकांनी या सुरक्षेच्या उपक्रमात सहभागी होऊन पोलिसांना सहकार्य करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news