Drug Smugglers : अखेर ड्रग्ज तस्करांना घरे पाडण्याच्या नोटीस

पोलिस आयुक्तांच्या पत्रानंतर कारवाईला वेग, आठ दिवसांत कागदपत्रे न दिल्यास घरे जमीनदोस्त
drug smugglers
ड्रग्ज तस्करांच्या घरांवर चालणार बुलडोझर !Pudhari News Network
Published on
Updated on

Drug Smugglers: Finally, notices to demolish houses of drug smugglers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी थेट त्यांच्या अनधिकृत घरे, अड्ड्यांवर बुलडोझर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ड्रग्ज विक्रीचा अड्डा बनलेली तस्करांची अनधिकृत घरे आता जमीनदोस्त होणार आहेत.

drug smugglers
गोदावरीत सोन्याचे दागिने शोधण्यासाठी गर्दी

पोलिस आयुक्तांनी ६० सराईत गुन्हेगारांची ब्लॅक लिस्ट मनपा आयुक्तांना १६ फेब्रुवारीला दिली होती. पालिकेने आठ दिवसांत मंगळवारपर्यंत (दि.२३) केवळ ३२ कुख्यात तस्करांच्या घरी नोटीस बजावल्या आहेत. घराच्या मालकी हक्काचे आणि बांधकाम परवानगीचे पुरावे सादर करण्यासाठी ८ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. उर्वरित नोटीस दोन दिवसांत पोहोच होतील, असे अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.

गेल्या दीड वर्षात पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ड्रग्ज फ्री सिटीसाठी धडक मोहीम राबवत गांजा, एमडी, नशेच्या गोळ्या आणि कफ सिरपची रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत ४०० हून अधिक आरोपींना वेड्या ठोकल्या. तरीही ६० सराईत गुन्हेगार जामिनावर सुटून पुन्हा आपल्या घरातूनच नशेचा वाजार चालवीत असल्याचे समोर आले.

drug smugglers
Bor Dahegaon Dam news | बोर दहेगांव मध्यम प्रकल्पातून नदिपात्रात पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध

त्यामुळे आता केवळ अटक न करता ज्या घरातून हा काळा धंदा चालतो, ते घरच पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुकुंदवाडीत खुनाच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तांनी पुढाकार घेत मनपा आयुक्तांच्या सोबतीने रस्त्यावर उतरून शहरातील अतिक्रमणावर हतोडा चालविला. त्याचप्रकारे आता पालिकेनेही या तस्करांच्या घरांची कायदेशीर बाजू तपासून अनधिकृत घरे पाडण्यासाठी तत्परता दाखविण्याची गरज पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्व वॉर्ड कार्यालयांतून नोटीस बजावणे सुरू

पोलिसांनी दिलेल्या यादीत अशपाक पटेल, सय्यद फैजल ऊर्फ तेजा, पाचुंदे दाम्पत्य, अजय ठाकूर, अनिल माळवे, ज्ञानेश्वर यादव आणि दाऊद पठाण यासारख्या सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. सर्व वॉर्ड कार्यालयांमार्फत महार-राष्ट्र महानगरपालिका अधिनियम २६० अन्वये नोटीस बजावणे सुरू झाले असून, उर्वरित २८ जणांनाही दोन दिवसांत नोटीस पोहोचतील.

खर्चाची वसुलीही तस्करांकडूनच

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी स्पष्ट केले की, आठ दिवसांत कागदपत्रे सादर न केल्यास किंवा बांधकाम अनधिकृत आढळल्यास संबंधितांना ते स्वतः पाडावे लागेल. तसे न केल्यास महापालिका स्वतः बुलडोजर चालवून बांधकाम पाडेल आणि त्याचा सर्व खर्चही संबंधित व्यक्तीकडून वसूल केला जाईल. सर्व कायदेशीर बाजू तपासूनच कारवाई केली जाणार आहे, असेही वाहुळे यांनी स्पष्ट केले.

पुन्हा हिंमत होणार नाही !

पोलिसांच्या कारवाईनंतरही जर तस्कर सुधरणार नसतील, तर त्यांच्या अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर फिरवणे हाच एकमेव पर्याय आहे. महापालिकेने तातडीने ही कारवाई केल्यास शहरात नशेचा बाजार मांडणाऱ्यांची हिंमत तुटेल आणि तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे रॅकेट कायमचे नेस्तनाबूत होईल, असा विश्वास पोलिसांना आहे. त्यामुळे मनपा पोलिसांना कितपत गतीने सहकार्य करून ही मोहीम फत्ते करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news