कार अडवून तरुणाची दोन तोळ्यांची चेन हिसकावली

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू
 Crime News |
कार अडवून तरुणाची दोन तोळ्यांची चेन हिसकावलीFile Photo
Published on
Updated on

The search for the suspects is underway using CCTV footage.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमधून मित्र, मैत्रिणीसोबत जेवण करून कारने घराकडे निघालेल्या तरुणाची गाडी अडवून दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी वाद घालत गळ्यातील २१ ग्रॅमची सोनसाखळी लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि.१२) रात्री नऊच्या सुमारास एपीआय कॉर्नरजवळ घडली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

 Crime News |
Leopard News : विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

फिर्यादी ओंकार विजय दळवी (२४, रा. बीड बायपास, विनाश सोसायटी) याच्या तक्रारीनुसार तो हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी करतो. शुक्रवारी रात्री तो त्याचा मित्र चंद्रशेखर म्हस्के, मैत्रीण भूमिका पांडव सोबत एमआयडीसी चिकलठाणा भागातील हॉटेल पाम्स येथून जेवण करून घरी निघाले होते.

किया सर्व्हिस सेंटर येथे दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ केली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दळवी पुढे एपीआय कॉर्नरपर्यंत येताच आरोपींनी त्याची दुचाकी समोर नेऊन अडविले. बाहेर निघ असे म्हणत दमदाटी करत असल्याने चंद्रशेखर गाडीच्या बाहेर आला. तेव्हा अचानक एक जण गाडीमध्ये शिरला.

 Crime News |
ST Bus News : कमी उत्पन्न आणणाऱ्या वाहकांची यादी तयार

त्याने दळवीची कॉलर पकडून झटापट केली. तेव्हा चंद्रशेखरने त्याला पकडून बाहेर काढून दार लावून घेतले. गोंधळ पाहून नागरिकांची गर्दी होताच २५ ते ३० वयाचे दोघेही दुचाकीवरून पळून गेले. दळवीने गळ्याला हात लावून पाहिले तेव्हा त्याची २१ ग्रॅमची सोनसाखळी गायब असल्याचे दिसले. याप्रकरणी गुरुवारी (दि.१८) एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news