

ST bus Prepare a list of carriers that generate low revenue.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच आगारांतून कमी उत्पन्न आणणाऱ्या वाहकांची यादी विभाग नियंत्रकांनी तयार केली असून, पहिल्या टप्प्यात उत्पन्न कमी येण्याची कारणे जाणून घेणार आहोत. वारंवार तीच कारणे आली तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.
नेहूल यांनी विभाग नियंत्रकांचा पदभार स्विकारताच कर्मचाऱ्यांत शिस्त आणण्यासाठी वाहक, चालक, आणि अधिकारी यांचा व्हाट्सअप ग्रुप बनवला. यात कर्मचारी कार्यालयत, कर्तव्यावर वेळेवर जात आहेत की नाही, त्याच बरोबर विविध मार्गावरील बसेस वेळापत्रकांनूसार सोडण्यात येत आहेत की नाही याची दररोज अपडेट माहित घेण्यात येत आहे. वाहकांकडून अपेक्षित उत्पन्न येत आहे की नाही याचीही स्वतंत्र खातरजमा करण्यात येत आहे. जे कमी उत्पन्न आणत आहेत. त्याची स्वतंत्र यादी बनवण्यात आली आहे.
प्रत्येक आगाराची यादी तयार विभागातील प्रत्येक आगारांत ५ ते ६ वाहक कमी उत्पन्न आणणारे असल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्याशी दररोज संवाद साधून त्याची कारणे जाणून घेण्यात येत आहेत. या यादीतील वाहकांकडून वारंवार एकच किंवा समाधान कारक उत्तरे नाही भेटल्यास त्याच्यावर येणाऱ्या काळात कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, कमी उत्पन्न आणणाऱ्या वाहकांच्या यादीत वारंवार एकच नाव येत असेल तर त्याच्यावर समुदेशन करताच कडक कारवाईचे पाऊल उचलण्यात येणार आहे अशीही माहिती प्रमोद नेहूल यांनी दिली.
अडचणी समजून घेणे गरजेचे
अडचणी समजून घेणे गरजेचे केवळ कारवाई करणे एवढाच उद्देश नाही. उत्पन्न वाढवण्यासाठी वाहकही परिश्रम करत आहेत. त्यांनाही काही अडचणीमुळे अपेक्षित उत्पन्न मिळवता येत नाही. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा पहिला प्रयत्न असेल. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न राहील. अडचणी सोडवूनही ते जर कमी उत्पन्न आणत असतील तर मात्र योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले.