Sambhajinagar News : जि. प. मध्ये पार्किंगवरून हमरी-तुमरी; कार्यकर्त्यांची सुरक्षारक्षकाला दमदाटी

तुम्ही मला ओळखत नाही का? म्हणत रक्षकाला धक्काबुक्की
sambhajinagar news
जि. प. मध्ये पार्किंगवरून हमरी-तुमरी; कार्यकर्त्यांची सुरक्षारक्षकाला दमदाटीfile photo
Published on
Updated on

The parking issue at the ZP has severely escalated.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद निवडणुकांनंतर नवनिर्वाचित सदस्यांची ये-जा वाढली असून, त्यांच्यासोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीमुळे झेडपीतील पार्किंगचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. पार्किंगला शिस्त लावणाऱ्या एका सुरक्षारक्षकाला कार्यकर्त्याकडून दमदाटी आणि धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

sambhajinagar news
AIMIM corporator viral video : जुन्या शहराचे महापौर, खासदार-आमदार इम्तियाज जलीलच

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत आधीच पार्किंगसाठी अपुरी जागा आहे. त्यात आता नव्या पदाधिकाऱ्यांसोबत दररोज शेकडो कार्यकर्ते महागड्या गाड्यांमधून येत असल्याने संपूर्ण परिसर वाहनांनी गच्च भरून जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह सदस्यांच्या गाड्यांसाठी ठराविक जागा राखीव असते. मात्र उर्वरित जागा कार्यकर्त्यांच्या वाहनांनी व्यापली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी एका कार्यकत्यनि आपले वाहन चुकीच्या जागी उभे केले होते. सुरक्षारक्षकाने त्यांना वाहन योग्य ठिकाणी लावण्याची विनंती केली असता, संबंधित कार्यकर्ता संतापला. तुम्ही मला ओळखत नाही का? असे म्हणत तो रक्षकाच्या अंगावर धावून गेला व त्याने धक्काबुक्की केली.

sambhajinagar news
Chhatrapati Sambhajinagar strike impact : महसूलसह घाटी, आरटीओचे कामकाज विस्कळीत

सुरक्षारक्षक त्रस्त

नाव न छापण्याच्या अटीवर एका रक्षकाने सांगितले की, दररोज किमान दहा कार्यकर्ते आमच्याशी असाच वाद घालतात एकाने तर चक्क सीईओंच्या राखीव जागेतच गाडी लावली होती. वरिष्ठ अधिकारी पार्किंगवरून आम्हाला धारेवर धरतात, तर दुसरीकडे कार्यकर्ते अरेरावी करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news