AIMIM corporator viral video : जुन्या शहराचे महापौर, खासदार-आमदार इम्तियाज जलीलच

परवानगीविना काहीही करू नये, एमआयएम नगरसेवकाच्या दादागिरीचा व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल
AIMIM corporator viral video
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील फोटो.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरात एमआयएमचे प्रदे शाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या परवानगीशिवाय काहीच करायचे नाही. या भागाचे महापौर, आमदार, खासदार सर्व काही तेच आहेत, असे म्हणत एमआयएमचे नगरसेवक तथा निरोधी पक्षनेता समीर साजीद बिल्डर यांनी कचरा डेपोतील अधिकारांबर दादागिरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या दादागिरीविरोधात महापौर आणि प्रशासन काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेतील साडेपाच वर्षांच्या प्रशासकराजनंतर नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यात निवडून आलेल्या नवनिर्वाचित ११५ पैकी एमआयएमच्या ३३ नगरसेवकांनी सपशेल दादागिरी सुरू केली आहे. निवडणूक निकालानंतर शासकीय गॅजेटमध्ये या नवनिर्वाचित नगरसेवकांचे नावही प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांनी बॉडांमध्ये फेरफटका मारून अधिकारी- कर्मचाऱ्यांना झापण्यास सुरुवात केली होती.

AIMIM corporator viral video
एमआयएमच्या १४ नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार

हा प्रकार होत नाही तोच झोन कार्यालयांच्या बॉर्ड अधिकारी, मोकाट कुत्र्यांबाबत पशुसंवर्धन अधिकारी, उद्यान विभागाचे अधिकारी यांच्याशी वाद घालून धमकावणे, कामाबाबत कागदपत्रांची मागणी करणे, असे अनेक प्रक्र मागील दोन महिन्यांत घडले. गेल्या महिन्यात शहागंज परिसरात मुजोर पथविक्रेत्याने खरेदीसाठी आलेल्या महिलेसह तिच्या पतीला मारहाण केली.

दरम्यान, या पथविक्रेत्यांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, घटनेच्या दुसऱ्याच दिवशी महापालिकेच्या पथकाने येथील हातगाड्यासह दुकानांचे अतिक्रमण हटविले होते. मात्र महापालिकेच्या या कारवाईला विरोध करीत एमआयएम नगरसेवकांनी पथविक्रेत्यांच्या अतिक्रमणाला पाठिंबा दिला होता. या घटनेनंतर महापालिकेने संबंधित नगरसेवकांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा नोंदविला होता, तसेच तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी सदस्याच रद्द करण्याचा इशारा दिला होता.

आता या घटनेनंतर पुन्हा एमआयएमचे नगरसेवक नरमले होते, परंतु उयत्ता पुन्हा दादागिरी सुरू केली असून, अगोदर लेखा विभागात अन् त्यानंतर मनपा कचरा डेपोतील अधिकारावर दादागिरी केली. जुन्या शहरात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांच्या परवानगीशिवाय काहीही करण्म्याची हिम्मत करू नये, असा इशारा दिला. त्यामुळे एमआवठ्म नगरसेवकांच्या या दादागिरीमुळे अवता अधिकारीही धास्तावले आहेत.

AIMIM corporator viral video
Chatarapati Sambhajinagar: महापालिकेची पहिलीच सभा गाजली; २२ खोके’च्या घोषणांनी सभागृह दणाणले

महिला डॉक्टरला आरेरावी

नगरसेवकांच्या संख्याबळावर एमआयएमला ३ स्वीकृत नगरसेवक महापालिकेत पाठविता येणार आहे. त्यासाठी एमआयएमने त्यांच्या तीन इक्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. या इच्छुकांची लवकरच निवड होणार आहे. परंतु त्यापूनीच यातील मोहम्मद असरार अहेमद यांच्यासह इखान सालार यांनी सिडको एन-८ येथील महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन एका महिला डॉक्टरसोबत आंरेरावी केली. सायंकाळपर्यंत गुन्हा कोण दाखल करणार यावरूनच मनपात खलबते सुरू होती,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news