

The need for training for sustainable transformation of tourism
जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर : पर्यटनस्थळे व परिसरातील रहिवाशांना पर्यटन शिक्षण व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या संधी उपलब्ध करून दिल्या तर पर्यटनाचा शाश्वत विकास होणार आहे. आजघडीला राज्यात एक विदेशी पर्यटक आला तर त्याच्या सोबत तीन रोजगार उपलब्ध होतात. ही संधी रोजगारांत बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पर्यटन तज्ज्ञ डॉ. राजेश रगडे यांनी व्यक्त केले.
भारतातील पहिली जागतिक वारसा स्थळांमध्ये अजिठा आणि वेरूळ लेण्यांचा समावेश आहे. मराठवाड्यात या स्थळांसह इतर शेकडो पर्यटनस्थळे आहेत. त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात, परंतु त्यांच्याकडे पर्यटन शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अभाव असल्याने त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध नाहीत.
मराठवाड्यात पर्यटनाची महत्त्वाची स्मारके आहेत. जी वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतात, परंतु यातून रोजगार मात्र उपलब्ध होत नाही. यातून रोजगारांच्या संधी उपलब्ध करण्यासाठी शासनानेही स्थानिकांना डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्याची गरज आहे.
मराठवाड्यात ज्योतिर्लिंग : घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजिनाथ, शक्तीपीठे-तुळजापूर, माहूर आणि अंबाजोगाई येथील योगेश्वरी (देवी), लेणी-अजिंठा, वेरूळ, राजतडागा (औरंगाबाद), पितळ-खोरा, घटत्कोच, खरोरी, गुरुद्वारा : हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा नांदेड, किल्ले: दौलताबाद, नळदुर्ग कंधार आणि परंडा, दर्गा : सुफी संत बाबा शाह मुसाफिर, हजरत तुराबुल हक, जरझरी जर बक्ष आणि इतर, मकबरा : बीबी का मकबरा. ज्याला दख्खनचा ताज, असेही म्हणतात.
मराठवाड्यात अभायारण्यही पर्यटनस्थळे आहेत. बीड -यात नायगाव - मयूर अभयारण्य, येडशी रामलिंगघाट अ, धाराशिव नवीन माळढोक पक्षी अभयारण्य, जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठण, गौताळा औत्रमघाट अभयारण्य छत्रपती संभाजीनगर जळगाव याचबरोबर हस्तकलेसाठी पेठणी, हिमरू, मशरू आणि बिद्री हीही पर्यटनस्थळे झाली आहेत.
या सर्व ठिकाणी पर्यटनाचा शाश्वत विकास होणे जरुरी आहे. ज्या ठिकाणी अधिक पर्यटन आहे. त्या ठिकाणी एक नवीन आकर्षण स्थळ निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होतील, यासाठी पर्यटन शिक्षण घेत या संधीचा लाभ होईल. त्याचबरोबर आधी झालेल्या असंतुलित विकासामुळे झालेल्या नुकसानीची पुन्हा नव्याने शाश्वत विकास करणे आवश्यक आहे.