मनपाचा अर्थसंकल्प यंदाही ३२०० कोटींवर जाणार

स्पीलचा नवा आकडा वाढणार, प्रत्येक प्रभागात नव्या कामांचा समावेश
chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेटPudhari News Network
Published on
Updated on

The Municipal Corporation's budget is set to cross the ₹3,200 crore mark once again this year

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या निवडणुका झाल्याने यंदा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प हे प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर केले जाणार आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून गतवर्षाप्रमाणेच याही वर्षी अर्थसंकल्पाचा आकडा ३ हजार कोटींहून अधिक राहण्याची शक्यता आहे. यात स्पीलच्या कामांसह नव्या कामांचा मोठ्याप्रमाणात समावेश रा हणार आहे.

कोरोना महामारीमुळे मागील पाच वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक होते. गतवर्षी प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी ३ हजार ८३ कोटी चाळीस लाख ९९ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. महापालिकेला ३१ मार्चपूर्वी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करावे लागते.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Nanded ZP budget : जिल्हा परिषदेचा 23.26 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

त्यामुळे लेखा विभागाकडून मागील चार दिवसांपासून युद्धपातळीवर अर्थसंकल्पावर शेवटचा हात मारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाकडून संभाव्य कामांची यादी मागविण्यात आली, तसेच नागरिकांना नावीन्यपूर्ण कामे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार तयार करण्यात आ-लेले बजेट तब्बल तीन हजार २०० कोटींवर जाण्याची शक्यता सूत्रांनी सांगितली.

लवकरच बजेट स्थायी समितीला सादर केले जात असून, स्थायी समिती त्यात आवश्यक सुध ारणा करून सर्वसाधारण समितीला सादर करेल. त्यामुळे प्रशासनाने सादर केलेल्या बजेटमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेने ८२२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यासोबत विविध शासकीय योजनांपोटी मिळणाऱ्या अनुदानाचा १५० कोटीच्या जुन्या (स्पील) कामांचा बजेटमध्ये समावेश असल्याने आकडा तीन हजार कोटींवर गेला आहे.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Maharashtra Budget 2026: शेतकऱ्यांसाठी चौथी कर्जमाफी जाहीर; फडणवीस सरकारचा 2026-27 चा अर्थसंकल्प विकासाभिमुख

प्रत्येक प्रभागाचे प्रस्ताव

नवीन आणि स्पीलओव्हरच्या कामांसाठी गतवर्षी ६१८ कोटी ३१ रुपयांची तरतूद केली होती. परंतु, यंदा प्रत्येक प्रभागांसाठी चार नगर-सेवक असल्याने त्यांच्याकडून विकास कामांचे प्रस्ताव येतील. त्यामुळे गतवषपिक्षा यंदा अर्थसंकल्पाचा आकडा अधिक फुगणार, असेच चित्र दिसत आहे.

यंदाही नावीन्यपूर्ण योजनेचा समावेश

नावीन्यपूर्ण योजनेसाठी गतवर्षी १४८ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात देखील अशी तरतूद केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news