मनपा आयुक्तांकडून नव्या नगरसेवकांना स्वागताचे पत्र

शहर विकासासाठी प्रशासन-लोकप्रतिनिधींच्या समन्वयाचा संदेश : मनपा इतिहासातील पहिलाच उपक्रम
Chhatrapati Sambhajinagar
मनपा आयुक्तांकडून नव्या नगरसेवकांना स्वागताचे पत्रFile Photo
Published on
Updated on

The municipal commissioner sent a welcome letter to the new corporators.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका आयुक्तांनी नव्याने निवडून आलेल्या सर्व ११५ नगरसेवकांना स्वागताचे पत्र पाठवले असून यात त्यांनी शहर विकासासाठी प्रशासन -लोकप्रतिनिधींच्या समन्वयाचा संदेश दिला आहे. यात शहरवासीयांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांना मूर्त स्वरूप देणे हे सर्वांचे सामूहिक ध्येय असावे, असा संदेश या पत्रातून देण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar
ZP Election : माघारीसाठी 'साम-दाम-दंड-भेद'चे राजकारण सुरू

पारदर्शक प्रशासन, नियोजनबद्ध विकास योजना आणि सर्वसमावेशक शहर उभारणीसाठी लोकप्रतिनिधींच्या सूचना, कल्पना व सहभाग अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या ११५ नगरसेवकांचे स्वागत यंदा संभावित मानानितका छत्रपती संभाजीनगर प्रशासनाकडून वेगळ्याच पद्धतीने करण्यात आले आहे.

औपचारिक सत्कार किंवा कार्यक्रमाऐवजी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रत्येक नवनिर्वाचित नगरसेवकाला वैयक्तिक पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच असा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा होत आहे. आयुक्त श्रीकांत यांनी आपल्या पत्रातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे शहराच्या प्रगतीचे समान भागीदार असल्याचे अघ ोरेखित केले आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी परस्पर सहकार्य आवश्यक असून या समन्वयातूनच विकासकामांना अपेक्षित गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Crime News : माजी नगरसेवकाची सामाजिक कार्यकर्त्याला गोळ्या मारण्याची धमकी

नागरिकांना दर्जेदार व वेळेत सेवा देणे, तसेच नव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नगरसेवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शहरवासीयांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांना मूर्त स्वरूप देणे हे सर्वांचे सामूहिक ध्येय असावे, असा संदेश या पत्रातून देण्यात आला आहे.

पारदर्शक प्रशासन, नियोजनबद्ध विकास योजना आणि सर्वसमावेशक शहर उभारणीसाठी लोकप्रतिनिधींच्या सूचना, कल्पना व सहभाग अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. भविष्यातील छत्रपती संभाजीनगरकडे नागरिक आशेने पाहत आहेत, ही जाणीव ठेवून जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रशासनिक इतिहासात नवा पायंडा

१९८८ पासून आजपर्यंत महापालिकेच्या सात सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. मात्र या कालावधीत कोणत्याही आयुक्तांनी लोकप्रतिनिधींचे स्वागत अशा प्रकारे केलेले नव्हते. त्यामुळे आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतलेला हा पुढाकार महापालिकेच्या प्रशासनिक इतिहासात नवा पायंडा पाडणारा ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news