Crime News : माजी नगरसेवकाची सामाजिक कार्यकर्त्याला गोळ्या मारण्याची धमकी

फेसबुक पोस्टवरून वाद; पुंडलिकनगर भागातील प्रकार
Former corporator threatens social activist
Crime News : माजी नगरसेवकाची सामाजिक कार्यकर्त्याला गोळ्या मारण्याची धमकीPudhari File Photo
Published on
Updated on

Former corporator threatens social activist with shooting

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फेसबुकवर टाकलेल्या एका पोस्टवरून झालेल्या वादातून एका सामाजिक कार्यकर्त्याला माजी नगरसेवकाने फोनवर अश्लील शिवीगाळ करत गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.२२) रात्री साडेदहाच्या सुमारास बंबाटनगर भागात घडली. गजानन मनगटे असे आरोपी माजी नगरसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Former corporator threatens social activist
Crime News : तरुणाला दोन पोलिसांची काठी तुटेपर्यंत बेदम मारहाण

फिर्यादी ज्ञानेश्वर गायकवाड (४६, रा. बंबाटनगर, बीड बायपास रोड) हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात. नुकतीच महापालिका निवडणूक संपल्यानंतर वाद शांत व्हावे म्हणून त्यांनी गुरुवारी त्यांच्या ज्ञानेश्वर पाटील गायकवाड या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी इलेक्शन जपा रिलेशन असा मजकूर आणि त्यात गायकवाड आणि जंजाळ पाटील यांचा फोटो होता.

या पोस्टवर आरोपी गजानन मनगटे (रा. न्याय नगर, गारखेडा परिसर) याने वाद उकरून काढला. पोस्टवर अश्लील, शिवीगाळ करणाऱ्या कमेंट केल्या. गायकवाड यांची समाजात मानहानी झाली. त्यामुळे गायकवाड यांनी मनगटे यांना रात्री साडेदहाच्या सुमारास कॉल करून अश्लील कमेंट करू नका असे सांगितले. त्यावर मनगटे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

Former corporator threatens social activist
ZP Election : माघारीसाठी 'साम-दाम-दंड-भेद'चे राजकारण सुरू

तू २०२४ ला भाजप पक्षाचे काम केलेस, माझ्या नादी लागू नकोस, माझ्या चार कंपन्या आहेत. तुला १०० टक्के मारणार, अशी धमकी त्याने फोनवरून दिली. तसेच तुला गोळ्या घालून मारून टाकेन, घरात घुसून तलवारीने ठार मारून टाकीन, असे म्हणत आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले आहे. गायकवाड यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आर- ोपी गजानन मनगटे विरुद्ध बीएनएस कलम ३५१(३), ३५२ आणि ३५६ (१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news