महापौर - उपमहापौरांची उद्या निवड

युतीकडे ७० नगरसेवकांचे संख्याबळ : सत्ताधाऱ्यांचा विजय निश्चित
Who will be Sambhaji Nagar's 23rd mayor?
महापौर - उपमहापौरांची उद्या निवडpudhari photo
Published on
Updated on

The mayor and deputy mayor will be elected tomorrow

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेवर तब्बल पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर अखेर लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार असून, मंगळवारी (दि.१०) शहराच्या नव्या महापौर व उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. संख्याबळाच्या जोरावर सत्ताध-ारी भाजप-शिंदेसेना युतीचा विजय निश्चित मानला जात असून, महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौरपदी शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड जवळपास ठरलेली आहे.

Who will be Sambhaji Nagar's 23rd mayor?
Sambhajinagar ZP Result 2026: छत्रपती संभाजीनगमध्ये भाजपची सरशी, शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर

महानगरपालिकेच्या २९ प्रभागांतून एकूण ११५ नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये भाजपने ५७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिंदेसेनेकडे १३ नगरसेवक असून, दोन्ही पक्ष मिळून सत्ताधारी युतीकडे एकूण ७० नगरसेवकांचे बळ आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार असल्याचे चित्र आहे.

विरोधी पक्ष एमआयएमकडे ३३ नगरसेवक असून, निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी त्यांनी महापौर व उपमहापौर दोन्ही पदांसाठी उमेदवार दिले आहेत. मात्र संख्याबळाच्या तुलनेत त्यांचा प्रभाव मर्यादित राहणार आहे. ठाकरे गटाकडे ६ तर वंचित बहुजन आघाडीकडे ४ नगरसेवक आहेत.

Who will be Sambhaji Nagar's 23rd mayor?
नरभक्षक बबलाच्या भावाचे हर्सलच्या कारागृहातून पलायन

सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया

महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया मंगळवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नगरसेवकांना उमेदवाराच्या समर्थनार्थ उभे राहून मतदान करता येणार असून, अनुपस्थित व मतदान न करणाऱ्या नगरसेवकांची नोंद कार्यवृत्तात केली जाणार आहे.

समीर राजूरकर ठरणार शहराचे २३ वे महापौर

भाजपचे समीर राजूरकर यांची मंगळवारी महापौरपदी निवड होणार असून, ते शहराचे २३ वे महापौर म्हणून महापालिकेच्या इतिहासात नोंदवले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news