Manoj Jarange : तर मराठा समाजाने आगामी निवडणुकीत धडा शिकवावा : जरांगे

चिंचपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण
Manoj Jarange
Manoj Jarange : तर मराठा समाजाने आगामी निवडणुकीत धडा शिकवावा : जरांगेfile photo
Published on: 
Updated on: 

The Maratha community should teach a lesson in the upcoming elections: Jarange

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाज हक्काच्या आरक्षणासाठी लढा देत आहे. मात्र, काही लोक आरक्षणाला विरोध करून समाजाला संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांना मराठा समाजाने आगामी निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Manoj Jarange
Sambhajinagar News : नागरिकांचा विरोध झुगारून स्मार्ट मीटर बसवण्याची घाई

तालुक्यातील चिंचपूर येथे रविवारी (दि. १६) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, समाजाची सद्यःस्थिती, तरुणांचे भविष्य आणि राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले.

मराठा समाजाची दशा आणि दिशा यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, एकेकाळी जमीनदार असलेला शेतकरी आज गुंठ्यावर आला आहे. त्यामुळे पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे. मराठा समाजातील तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता पूर्णपणे व्यसनमुक्त राहावे. व्यसनांपासून दूर राहून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, उच्च शिक्षण घेऊन अधिकारी व्हावे, तसेच चांगले उद्योग-व्यवसाय उभारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

Manoj Jarange
Land Mafia : मनपाच्या २२७७ चौ.मी. जागेवर भूमाफियांचा डोळा

या अनावरण कार्यक्रमाला आमदार अब्दुल सत्तार, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पा. लोखंडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, उपसभापती भगवान आहेर, एकनाथ हिवाळे, सरपंच कैलास जंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. मनोज जरांगे यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने तालुक्यातील मराठा समाजबांधव आणि शिवप्रेमींनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

भगवे झेंडे, टोप्या ठरल्या लक्षवेधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शिवप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. शिवप्रेमींनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. गाव विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. गावातील भगवे झेंडे आणि तरुणांच्या डोक्यावरील भगव्या टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.