

Haste to install smart meters, brushing aside opposition from citizens
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट मीटरमुळे जास्त बील येत असल्याने शहरातील ग्राहक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी याला विरोध होत आहे. मात्र हा विरोध झुगारत आता स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला वेग देण्याचे निर्देश नुकतेच महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले आहेत.
औंढेकर यांनी मसिआच्या सभागृहात शनिवारी (दि.१४) छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत ग्राहकांसाठी अभय योजना सुरू केली आहे. या योजनेचे फायदे ग्राहकापर्यंत पोहोचवून महसूलवाढीवर भर द्या. याच बरोबर स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही दिले.
महावितरण स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक वीजबिल आणि दिवसा वीजवापरावरील सवलतीचा लाभ मिळत असल्याचा दावा करत असले तरी बिल मात्र जास्त येत असल्याची ओरड सुरूच आहे. या बाबतीत ग्राहकांचे समाधान करतांना अधिकारी तांत्रिक बाबी समोर मांडत असल्याने ग्राहकांचे समाधान होत नाही. त्यामुळे स्मार्ट मीटरला आजही ग्राहक विरोध करत आहेत.