Mangalsutra Snatched : मुकुंदवाडीत शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र ओरबाडले

सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्याने ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात घडली आहे.
Sambhajinagar Crime
Mangalsutra Snatched : मुकुंदवाडीत शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र ओरबाडलेFile Photo
Published on
Updated on

The mangalsutra of a woman performing Shatapawali in Mukundwadi was scratched

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जेवण आटोपून शेजारील महिलेसोबत शतपावली करत असलेल्या एका ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्याने ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना मुकुंदवाडी परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दीपाली रेसिडेन्सीसमोर घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar Crime
Crime News : धक्कादायक : घराच्या मालकी हक्कावरून पोटच्या मुलानेच बापाचा काटा काढला

फिर्यादी मीना मधुकर माळी (५२, रा. प्लॉट नं. ११५, एन २ सिडको, राजीव गांधीनगर) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या शेजारी राहणाऱ्या अनिता सुनील बोरसे यांच्यासोबत जेवण झाल्यानंतर पायी चालण्यासाठी बाहेर पडल्या होत्या.

त्या महालक्ष्मी चौक ते कामगार चौक असा पायी फेरफटका मारत असताना, रात्री ९.३० च्या सुमारास झाबंड यांच्या बंगल्याच्या गल्लीतील दीपाली रेसिडेन्सी (विंग ए) समोर आल्या. यावेळी मागून दुचाकीवर एक जण त्यांच्या जवळून गेला. तो थोडा पुढे जाऊन पुन्हा यू-टर्न घेत त्यांच्याजवळ आला आणि त्याने क्षणार्धात मीना यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले.

Sambhajinagar Crime
Partur Theft News : खांडवी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या

मंगळसूत्र तोडल्यानंतर या भामट्याने तात्काळ झाबंड बंगल्याच्या दिशेने दुचाकीवरून पोबारा केला. मीना आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनिता यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. त्यानंतर मीना यांनी त्यांचे पती मधुकर माळी यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि मुकुंदवाडी ठाणे गाठून तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news