Crime News : धक्कादायक : घराच्या मालकी हक्कावरून पोटच्या मुलानेच बापाचा काटा काढला

सिल्कमिल परिसर : चाकूने सपासप वार; बहिणीवरही जीवघेणा हल्ला
Crime News
Crime News : धक्कादायक : घराच्या मालकी हक्कावरून पोटच्या मुलानेच बापाचा काटा काढलाfile photo
Published on
Updated on

Amidst a property dispute, a son brutally murdered his elderly father by repeatedly stabbing him with a knife

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मालमत्तेच्या वादातून मुलानेच स्वतःच्या वृद्ध वडिलांवर चाकूने सपासप वार करून निघृण हत्या केली. ही थरारक घटना सिल्कमिल परिसरात गुरुवारी (दि.११) सायंकाळी घडली. जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल (८२, रा. सध्या पुणे) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मृत जाफर पटेल आरोपी अब्दुल रहेमान वडिलांचे नाव आहे.

Crime News
Sambhajinagar News : पप्पांना सांगून तुला मारायला लावतो : 10 वर्षांच्या चिमुकल्याला धमकावले

वडिलांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या बहिणीलाही आरोपीने चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मुलगा अब्दुल रहेमान अब्दुल जाफर (४५, रा. सिल्कमिल कॉलनी) याला ताब्यात घेतले असून, त्याने औषधींचा ओव्हरडोस घेतल्याने उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, जाफर पटेल आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान यांच्यात घराच्या मालकी हक्कावरून न्यायालयात दीर्घ काळापासून वाद सुरू होता. नुकताच निकाल वडिलांच्या बाजूने लागल्याने घराचा ताबा घेण्यासाठी पुणे येथून जाफर पटेल आणि त्यांची मुलगी शहरात आले होते. सिल्कमिल परिसरातील प्लॉटवर पोलिस बंदोबस्तात तहसीलदारांनी त्यांना घराचा अधिकृत ताबा दिला. तिथे आरोपीने येऊन प्रचंड राडा केला.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

औषधी गोळ्या घेण्याचे नाटक करत ताबा मिळवण्यात अडचणी आणल्या. मात्र सातारा पोलिसांनी धाव घेत प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तहसीलदार आणि पोलिस तेथून निघून गेले. पटेल काही अंतरावर गेल्यावर मुलाने कुलूप तोडले असेल, असे म्हणत पुन्हा तपासणीसाठी गेले. कुलूप व्यवस्थित असल्याची खात्री करून परतत असताना आरोपीने त्यांना गाठले व मोपेडच्या डिक्कीतील चाकू काढून वडिलांवर सपासप वार करून ठार केले. आपल्या वडिलांवर हल्ला होत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या बहिणीवरही आरोपीने जीवघेणा हल्ला केला.

मृत पटेल हे जलसंपदा विभागातून अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत, तर त्यांची सर्व मुले शिक्षित आहेत. आरोपी रहेमान हा मेडिकल दोन्ही मुले व वडील एकत्र राहत होते. आरोपी मुलगा सातत्याने घरातील सदस्यांशी वाद घालायचा. त्याच्या पहिल्या लग्नात पत्नीने आरोपीवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केल्याने त्याने दुसरा विवाह केला. मध्यंतरी वडिलांना मारहाणही केली. त्यामुळे बहिणीने वडिलांना पुण्याला राहण्यासाठी नेले होते. त्यानंतर शिक्षित वडिलांनी कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबला.

गळा, छाती, पोट अन् हातावर ८ वार

आरोपीने चाकूने वडिलांच्या गळ्यावर, पोटावर, छातीत आणि हातावर तब्बल ८ वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या जाफर पटेल यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर जखमी बहिणीच्या तोंडावर आणि गळ्यावर पाच वार केले. तिच्यावर घाटीत उपचार सुरू असून, तिला १५ ते २० टाके पडल्याची माहिती उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांनी दिली.

आरोपीला मिटमिटा येथून ठोकल्या बेड्या

आरोपी रहेमान पडेगाव परिसरात पळून गेल्याची माहिती मिळताच छावणी ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव, सातारा ठाण्याचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, हवालदार सुनील बेलकर, दिगंबर राठोड आणि महेश गोले यांच्या पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवली. रात्री ९ वाजेच्या सुमारास मिटमिटा येथील एका नातेवाइकाच्या घरातून रहेमानला ताब्यात घेतले. त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने तो नशेत असल्याचा संशय असून, त्याला तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news