Bail Pola : बळीराजाकडून वरुणराजाला साकडे !

शहरात बैलपोळा सणाचा उत्साह : घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन अन् पुरणपोळीचा नैवेद्य
Bail Pola
Bail Pola : बळीराजाकडून वरुणराजाला साकडे !File photo
Published on
Updated on

The farmer earnestly implored the Rain God for rain

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी आणि ग्रामीण संस्कृतीशी नाते सांगणारा पारंपरिक बैलपोळा सण शहरात व उपनगरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या या सणानिमित्त घरोघरी मातीच्या वाडबैलांचे पूजन करण्यात आले. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने सणाचा आनंद साजरा करतानाच बळीराजाने वरुणराजाला पावसासाठी मनोभावे साकडेही घातले.

Bail Pola
MPSC paper leak : एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ महामोर्चा; वाहतूक मार्गात बदल

शहरातील बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच मातीचे वाडबैल आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. ज्या कुटुंबांकडे प्रत्यक्ष बैल नाहीत, अशा शहरी भागातील नागरिकांनी मातीच्या वाडबैलांची मनोभावे पूजा करून परंपरेचे जतन केले. घरोघरी पुरणपोळी, भाजी, भात आणि आमटीचा बेत आखून वाडबैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. घरातील ज्येष्ठांसह लहान मुलांनीही या पूजनात उत्साहाने सहभाग घेतला.

Bail Pola
Electricity thieves : वीजचोरांना बसणार 'एआय'चा शॉक; ३ महिन्यांत ६६ कोटींची वीजचोरी उघड !

चिकलठाणा, हर्मूलमध्ये मिरवणूक

चिकलठाणा आणि हसूल परिसरात प्रत्यक्ष बैलपोळ्याची लगबग दिसून आली. शेतकऱ्यांनी आपल्या 'सर्जा-राजा'ला आकर्षकरीत्या सजवून पारंपरिक पद्धतीने त्यांची पूजा केली. चिकलठाणा येथे सायंकाळी जिल्हा रुग्णालयापासून मारुती मंदिरापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मारुती मंदिरात दर्शन घेऊन पोळा फुटल्यानंतर गावातून मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांची परंपरा गावकऱ्यांनी कायम राखली त्यानंतर घरोघरी जाऊन बैलांचे पुजन करण्यात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news