Electricity thieves : वीजचोरांना बसणार 'एआय'चा शॉक; ३ महिन्यांत ६६ कोटींची वीजचोरी उघड !

इंटेलिजन्सच्या मदतीने २७ हजार चोऱ्यांचा पर्दाफाश; २८९ जणांवर फौजदारी गुन्हे
Electricity thieves
Electricity thieves : वीजचोरांना बसणार 'एआय'चा शॉक; ३ महिन्यांत ६६ कोटींची वीजचोरी उघड !file photo
Published on: 
Updated on: 

Electricity thieves will get the shock of 'AI'; Electricity theft of 66 crores revealed in 3 months!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वीजचोरी शोधण्यासाठी महावितरणने आता एआयच्या सुपर इंटेलिजन्सचा वापर सुरू केला आहे. तब्बल १९० भरारी पथकांकडून वीज जोडण्यांची तपासणी आणि एआय मॉड्यूलच्या विश्लेषणातून गेल्या तीन महिन्यांत ६६ कोटी २८ लाख रुपयांच्या २७ हजार ९६४ वीजचोऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. आतापर्यंत वीजचोरी व तडजोड शुल्काची रक्कम न भरलेल्या २८९ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Electricity thieves
Cyber Fraud : सावधान ! हज यात्रेकरू सायबर भामट्यांच्या रडारवर

वीजचोरीविरोधी पारंपरिक तपासणीसोबतच महावितरणने आता हायटेक मोहीम उघडली आहे. यासाठी थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचा वापर करून वीजचोरीचे अचूक भाकित करणारे मोड्यूल तयार केले आहे. वीजग्राहकांचा किंवा परिसरातील वीज वापराचा जुना आलेख, अचानक घटलेली किंवा वाढलेली मागणी, मीटरमधील तांत्रिक फेरफार आणि इतर ५० हून अधिक तांत्रिक निकषांचे हे मॉड्यूल २४ तास विश्लेषण करत आहे.

ज्या ग्राहकांच्या वीजवापरामध्ये शंकास्पद फरक आढळत आहे त्या ग्राहकांना हे एआयचे मॉड्यूल हाय-रिस्क श्रेणीत टाकत आहे. त्यामुळे कोणत्याही तपासणीशिवाय थेट चोरी होणाऱ्या ठिकाणाची अचूक माहिती या मोड्यूलद्वारे उपलब्ध होत आहे.

तीन महिन्यांत २८९ गुन्हे दाखल

गेल्या जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत महावितरणच्या विशेष पथकांनी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात ५ हजार ८३, कोकण- ११ हजार ८३, नागपूर - ५ हजार ९४९ आणि पुणे प्रादेशिक विभागात ५ हजार ८४९ अशा २७हजार ९६४ वीजचोऱ्या उघड केल्या आहेत. त्यातील २४ हजार ५०८ जणांनी ६६ कोटी २८ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत २८९ प्रकरणांत विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत-

Electricity thieves
Sand Mafia : वाळूमाफियांना पोलिसांचा दणका ८ महिन्यांत तब्बल २३८ गुन्हे दाखल

वीज हानी कमी करण्याचे उद्दिष्ट

येत्या तीन वर्षात महावितरणची तांत्रिक व वाणिज्यिक हानी १० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वीजबिलांच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देत विजचोरीविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीजचोरी उघड करण्यासाठी एआय मॉड्यूल विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे धडक कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news