Sambhajinagar News : कुत्र्याची विषबाधा झाल्याची धास्ती, रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी अख्खे गाव रुग्णालयात

बिडकीनपासून अवघ्या तीन तीन किलोमीटर अतंराच्या म्हारोळा येथे गाईला आणि वासरला कुत्रा चावल्याने वासराचा शुक्रवारी मृत्यू झाला.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : कुत्र्याची विषबाधा झाल्याची धास्ती, रेबीज इंजेक्शन घेण्यासाठी अख्खे गाव रुग्णालयातFile Photo
Published on
Updated on

The entire village went to the hospital to get rabies injection.

हसन चाऊस

बिडकीन: बिडकीनपासून अवघ्या तीन तीन किलोमीटर अतंराच्या म्हारोळा येथे गाईला आणि वासरला कुत्रा चावल्याने वासराचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर गायीलाही गंभीर इजा झाली आहे. त्या गायीचे दूध, दही आपणही खाल्ले. त्यामुळे आपलाही विषबाधेने मृत्यू होईल या भीतीपोटी म्हारोळा येथील २०० पेक्षा जास्त गावकऱ्यांनी रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी शनिवार दि.१९ रोजी बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी एकच गर्दी केली होती. यामुळे रुग्णालयातील कर्मचारी आवाक झाले होते.

Sambhajinagar News
Sambhajinagar Political News : पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे : खासदार सुनील तटकरे

याबाबत माहिती अशी की, म्हारोळा येथील एका पशुपालकांकडून गावातील अनेकजण गायीचे दूध, दही खरेदी करतात. शुक्रवारी त्या पशुपालकाच्या एका गायीला आणि वासराला कुत्र्याने आठवड्वाड्यापूर्वी चावा घेतला होता. या घटनेत वासराचा शुक्रवारी मृत्यू झाला तर गायीलासुध्दा मोठी इजा झाली आहे. पशुवैद्यकीय अधिकार्याने सदर मृत वासरास मोठा खड्यात पुरण्याचे सांगितले होते. तसेच गायीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.

काही दिवसापूर्वी रेबीज झाल्याने आंतरराष्टीय कबड्डी पटूचा मृत्यू झाला होता. गायीचे दूध प्यालाने वासराचा मृत्यू झाला. आपणही गायीचे दूध, दही खाल्ले यामुळे आपल्याही रेबीजचा संसर्ग होईल या भीतीपोटी गावातील २०० पेक्षा जास्त नागरिकांनी सकाळीच बिडकीन ग्रामीण रुग्णालयात धाव घेत लाईन लावून रेबीजचे इजेक्शन टोचून घेतले. रुग्णालयात अचानक इतके लोक आल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच धांदल उडाली होती.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhaji Nagar Crime |वरठाणमध्ये पेट्रोल पंप मालकावर सिनेस्टाईल हल्ला; हॉकी स्टिक, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण!

रेबीजने गावातील युवकाचा मृत्यू

पैठण तालुक्यातील म्हारोळा गावात एक वर्षापूर्वी गावातील एका तरुणाला कुत्रा चावला होता. मात्र, त्याने थातूरमातूर उपचार केले होत. काही दिवसांना सदर तरुणाचा रेबीजच्या संसगनि मृत्यू झाला होता. यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर कुत्र्याच्या चाव्याने एका वासराचा मृत्यू झाला तर गायसुध्दा गंभीर जखमी आहे. या धास्तीने ग्रामस्थांनी रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी रुग्यालयात गर्दी केली होती. आतापर्यंत २०० जणांना रेबीजचे इंजेक्शन दिल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news