Sambhajinagar Political News : पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे : खासदार सुनील तटकरे
Party officials and workers should work together: MP Sunil Tatkare
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस यश मिळवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे प्रदे-शाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (दि.१८) पक्षाच्यावतीने आयोजित निर्धार नवपर्व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात दिले.
शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तटकरे यांनी तडाखेबंद भाषणातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले. त्यांच्या या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. याप्रसंगी व्यासपीठावर महिला प्रदे शाध्यक्ष रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रवक्ते आनंद परांजपे, शहराध्यक्ष अभिजित देशमुख, मराठवाडा युवक अध्यक्ष दत्ता भांगे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष स्वाती कोल्हे आणि विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी तटकरे म्हणाले, निर्धार नवपर्वचा हा केवळ कार्यक्रम नसून, पक्षाच्या नव्या वाटचालीची सुरुवात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदे शानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकसंघ काम करणे गरजेचे असल्याचे सांगत या निवडणुकाबाबात रणशिंग फुकले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षांनी एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल, असा फेक नरेटिव्ह सेट केला गेला. त्यामुळे महार- ाष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाली. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना यासह शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमुळे राज्यात महायुतीला भरघोस यश मिळाल्याचे तटकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा उहापोह केला. तर आम्ही विकासाच्या राजकारणासाठी महायुतीत सामील झालो आहोत.
विरोधक फक्त टीका करत बसतात, पण आम्ही काम करून दाखवतो, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर पुढे जात असून, आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्यात तटकरे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध भागांतील पाच माजी नगरसेवकांसह उबाठा गट, भाजप, काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनीचा श्वास निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी पक्षाचे विविध आघाड्यांचे शहराध्यक्ष, युवा आघाडीचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची ताकद वाढली असल्याचे दिसून आले.
पाच माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश
शहरातील नेहरूनगर किराडपुरा भागाचे माजी नगरसेवक अजीज खान गणी खान, काँग्रेस माथाडी कामगार सेलचे अध्यक्ष बायजीप-राचे माजी नगरसेवक अबू बकर अमोदी, भडकलगेट येथील अब्दुल खादर, संजयनगर बायजीपुराचे माजी नगरसेवक नूर जहा बेगम रहेमान खान व शब्दातीनगरचे माजी नगरसेवक शेख मसूद यांच्यासह विविध पक्षांतील काही पदाधिकारी, कर्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

