Crime News : अवैध दारूबंदीसाठी एकवटलं गाव सार

ग्रामसभेत आक्रमक भूमिका, पोलिसांना निवेदन
sambhajinagar news
अवैध दारूबंदीसाठी एकवटलं गाव सारfile photo
Published on
Updated on

The entire village united to ban illicit liquor

ढोरकीन, पुढारी वृत्तसेवा पैठण तालुक्यातील ढाकेफळ, मुलानी वाडगाव, जळगाव आदी परिसरात अवैध देशी व गुळाची हातभट्टी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. ढाकेफळ ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामसभेच्या माध्यमातून दारूबंदीसाठी पोलिस प्रशासनास निवेदन दिले. दारू विक्री व पिणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवून कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले.

sambhajinagar news
Drugs mafia : अश्पाकची भरचौकात धिंड

तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह अवैध हातभट्टी दारू अड्यावर आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पोलिस प्रशासनाच्या उपस्थित ग्रामसभा घेण्यात आली. या दारूबंदीच्या ग्रामसभेस बिडकीन पोलिस ठाण्याचे फौजदार मंजितसिंग सेना, बिट जमादार योगेश नाडे, हेडकॉन्स्टेबल अमोल मगर यांनी गावकऱ्यांचे सहकार्य लाभल्यास शंभर टक्के दारू बंदी होईल असे आश्वासन दिले.

यावेळी ग्रामस्थांनी व विशेषतः महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक भूमिका मांडली. बिडकीन पोलिस ठाणे व एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे दारूबंदीसाठी निवेदन पत्रावर स्वाक्षऱ्या हद्दीतील अवैध केल्या.

sambhajinagar news
Drug Smugglers : अखेर ड्रग्ज तस्करांना घरे पाडण्याच्या नोटीस

सरपंच भीमा मोर, उपसरपंच रवींद्र पाटील शिसोदे, मदन आव्हाड, सतीश श्रीसुंदर, योगेश शिसोदे, सुभाष आढाव, विकास शिसोदे, अमोल मोरे, गणेश शिंदे, कार्तीक फासाटे, पोलिस पाटील गोकूळ आढाव, तंटामुक्त अध्यक्ष अरुण कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष नागरिकांनी अवैध दारू तत्काळ बंद होण्यासाठी निवेदन पत्रावर स्वाक्षऱ्या करून कारवाईची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news