पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली

शहरातील पेट्रोल पंपांवर होणारी वाहनधानकांची गर्दी शनिवारी काही प्रमाणात ओसरली.
sambhajinagar petrol pump news
पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरलीfile photo
Published on
Updated on

The crowds at petrol pumps have subsided

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील पेट्रोल पंपांवर होणारी वाहनधानकांची गर्दी शनिवारी काही प्रमाणात ओसरली. तीन दिवसांपासून अनेक पंपांवर मोठ्या प्रमाणावर वाहनध-ारकांच्या रांगा लागत होत्या. परंतु शनिवारी सर्व पंपांवर पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध झाल्याने इंधन भरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली.

sambhajinagar petrol pump news
Petrol and Diesel : संभाजीनगरात दुचाकींना दोनशेचेच मिळणार पेट्रोल

लॉकडाऊन लागण्याच्या अफवांमुळे बुधवारपासून पेट्रोल पंपांवर अचानक वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. इंधन मिळेल की नाही या भीतीपोटी वाहनधारक टाक्या फुल्ल करून घेत होते. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवरील साठा संपून ते कोरडे पडले होते. परिणामी ज्या पंपांवर साठा उपलब्ध आहे, तिथेही गर्दी वाढली होती.

sambhajinagar petrol pump news
Petrol Pumps : पेट्रोल पंपांवर वाहनांच्या पुन्हा रांगा

प्रशासनाने खबरदारी म्हणून दुचाकीत दोनशे रुपयांपर्यंत आणि चारचाकीत दोन हजार रुपयांपर्यंत इंधन भरण्याची मर्यादा घातली होती. शुक्रवारी हे निर्बंध उठविण्यात आले. त्यानंतर शनिवारी जवळपास सर्व पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध झाला. त्यानंतर पेट्रोल पंपांवरील वाहनधारकांची गर्दीही बर्यापैकी ओ-सरली. शनिवारी काही पंपांवर रांगा होत्या, परंतु आधीच्या तुलनेत त्या कमी प्रमाणात होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news