

The body was brought directly to the Gram Panchayat office for the funeral
चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : पैठण तालुक्यातील नवगाव येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीच्या परिसरात अतिक्रमणामुळे त्रस्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी अंत्यविधी करण्यासाठी निधन झालेल्या व्यक्तीचे मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयात नेल्याचा प्रकार या गावात दुसऱ्यांदा घडला असून सदरील स्मशानभूमी परिसर अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी संताप्त नातेवाईकांनी केली आहे.
तालुक्यातील महत्त्वाची आणि मोठी ग्रामपंचायत नवगावची म्हणून ओळख आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामविकास विकास अधिकारी यांची असते. परंतु ग्रामविकास अधिकारी पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून सतत गैरहजर राहून कामकाज पाहत असल्यामुळे गाव परिसरात समस्यांचा डोंगर उभा राहिल्याचे दिसून येत आहे.
शनिवारीनवगाव येथील सुधाकर झेल ाजी हातागळे यांचे निधन झाल्यामुळे शनिवारी रोजी त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नातेवाईक या गावात दाखल झाले होते. परंतु मयत व्यक्तीचे मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी रस्ता नसल्याने व या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे अंत्यविधी करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला होता.
शेवटी संताप्त झालेल्या मयताच्या नातेवाईकांनी सदरील मृत्यदेह अंत्यविधीसाठी थेट नवगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात नेण्यात आले. हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.
मयताच्या नातेवाईकांनी मातंग समाजाचे स्मशानभूमी अतिक्रमण मुक्त करावा या मागणीवर ठाम राहून अंत्यविधी तोपर्यंत करणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे. काही काळ गावात शांततेत व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अंत्यविधीला विलंब होत असल्याने व ग्रामपंचायत विभागात ग्राम विकास अधिकारी अनुपस्थित असल्याने मयताचे काही नातेवाईकांनी समजूत काढल्यानंतर सुधाकर हातागळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.