

Paithani cluster will be set up: MLA Vilas Bhumre
पैठण पुढारी वृत्तसेवा: पैठणचा गौरव पैठणी असून या पैठणीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लवकरच पैठणी क्लस्टर निर्माण केले जाईल, असे प्रतिपादन पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केले. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
आमदार पैठण येथील मराठी पैठण साडी केद्रात आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विलासबापू भुमरे म्हणाले की पैठणची पैठणी जगभरात ओळखली जाते आता या पैठणीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विधानसभा अधिवेशनात पैठणीबाबतचा मुद्दा उपस्थित केला. यावर शासनाने प्रतिसाद दिला असून पैठणनगरीत लवकरच पैठणी क्लस्टर उभे केले जाईल.
या क्लस्टरच्या माध्यामातून शहरातील व परिसरातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल आणि बाजारात आर्थिक उलाढाल वाढेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात प्रसंगी विनकर राजेंद्र ढालकरी, जिजाबाई कुंटे, लक्ष्मीबाई वाहळ, हरजना शेख, मथुराबाई लंगोटे, मीरा शेळके, शमीम ग्राम, लियाकत ग्राम इत्यादींचा आमदार भुमरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग उपायुक्त प्रशांत सदाफुले, शिवनारायण चन्ना, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड, महिला आघाडीच्या पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पैठणी केंद्राचे व्यवस्थापक संजय कोटूरकर, कृष्णा बोंबले, अन्वर भाई तसेच शशिकला भोसले, एकनाथ भोसले, अरुण भोसले आदींनी प्रयत्न केले.