

The bail application of the accused teacher was rejected.
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर येथील ज्ञान प्रबोधिनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींशी अल्पवयीन अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचा जामीन अर्ज गंगापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने नामंजूर केला.
पीडित विद्यार्थिनींची सुसंगत व गंभीर विधाने तपासादरम्यान तपास अधिकाऱ्यांनी शाळेतील त्याच वर्गातील अनेक अल्पवयीन विद्यार्थिनींची विधाने नोंदविली आहेत. तसेच या सर्व मुलींची विधाने बी.एन.एस.एस. कलम १८३ अंतर्गत माननीय दंडाधिकाऱ्यांसमोरही रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
या विधानांमध्ये पीडित विद्यार्थिनींनी फिर्यादीतील आरोपांची पुष्टी करत, आरोपी शिक्षकाने त्यांच्या खासगी अंगावर व शरीरावर अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, सध्याच्या टप्प्यावर पीडित विद्यार्थिनींच्या सुसंगत व गंभीर विधानांवर अविश्वास ठेवण्यास कोणतेही कारण नाही.
आरोपी हा त्याच शाळेत शिक्षक असल्याने त्याचा विद्यार्थिनींवर प्रभाव असल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले. आरोपीस जामीन दिल्यास तो पीडित मुलींना धमकावू शकतो, पुराव्यांशी छेडछाड करू शकतो किंवा फरार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाचा स्पष्ट आदेश या सर्व बाबींचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी दि.११ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी शिक्षकाचा जामीन अर्ज नामंजूर करण्याचा आदेश गुरुवारी दिला. या सरकारतर्फे सरकारी वकील कृष्णा गंडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.