Jayakwadi Bird Sanctuary : यंदाही विदेशी पक्ष्यांचे आगमन लांबले

जायकवाडी धरणात पक्ष्यांच्या अधिवासावर बंधने, हवामानातील बदलाचा फटका
Jayakwadi Bird Sanctuary
Jayakwadi Bird Sanctuary : यंदाही विदेशी पक्ष्यांचे आगमन लांबलेpudhari
Published on
Updated on

The arrival of exotic birds has been delayed this year as well.

मोहन ठाकुर

पैठण :

जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांचे आगमन लांबले असून ऑक्टोबर महिन्यांच्या मध्यापर्यंत हजारोंच्या संख्येने नाथसागराच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदा चक्क जायकवाडी पक्षी अभयारण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्यात पक्ष्यांच्या अधिवासावर आलेली बंधने व हवामानातील बदलाचा फटका स्थलांतरित पक्ष्यांना बसत असल्याचे बोलले जाते आहे.

Jayakwadi Bird Sanctuary
ATM fraud Case : एटीएमच्या रकमेत १.१६ कोटींचा अपहार प्रकरणातील सहा जणांना बेड्या

दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत दाखल होणाऱ्या पक्ष्यांचे आगमन यंदा डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही न झाल्याने पक्षीमित्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. युरोप, रशिया यासह आशिया खंडाच्या विविध भागांत हिवाळ्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते. पक्ष्यांना अन्नाचा तुटवडा भासतो. त्यामुळे दरवर्षी तेथील पक्षी हजारो किलोमिटरचा हवाई प्रवास करीत जायकवाडी धरणावर स्थलांतर करतात. साधारणतः ऑक्टोबरच्या मध्यानंतर हे पक्षी जायकवाडी धरणाच्या जलाशयावर दिसून येतात. पुढे फेब्रुवारी अखेरपर्यंत ते मुक्काम ठोकतात.

नाथसागरचा दागिना

नाथसागराचा दागिना म्हणून गौरविण्यात आलेला फ्लेमिंगो ऊर्फ रोहित पक्ष्यांचे आगमन अद्याप न झाल्याने पक्षीमित्र हिरमुसले आहेत. जलाशयावर दरवर्षी हजारोच्या संख्येने येणारी बदके, करकोचे, कुराव, सुरेय हे पक्षी दुर्मिळ झाले आहेत स्थानिक पक्षात मुग्धबलक, चमचा, शराटी, सुरय, कूरव, शेकाट्या, घनवर बदक, पान कावळे, राखी सारंग, रंगीत करकोचे हे यंदा कमी संख्येने दिसून येत आहेत. तसेच वारकरी बदक, पाणकोंबडी, पानडुबी, पाणभिंग्री या पक्ष्यांचे तर अद्याप दर्शन झालेले नाही. परदेशी पक्ष्यांमध्ये माळ भिंगरी, किरा, तुत्वार, पट्टेरी हंस, थापट्या बदक, मत्स्य गरुड, पायमोज गरुड, पान घार, पानलावा, पान टीवळा हे पक्षी कमी संख्येने आले आहेत. क्रौंच पक्षी, तरंग बदक, चक्रांग बदक, तलवार बदक, भुवई बदक, हिरवा तूटवार हे सुध्दा जलाशयावर दिसले नाहीत.

Jayakwadi Bird Sanctuary
Minimum Temperature Decrease : थंडीचा जोर आणखी वाढणार, किमान तापमानात होणार घट

डिसेंबर अखेरपर्यंत आगमन

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभ्यासकांनी या बदलाची नोंद घेतली आहे. रशिया, उत्तर युरोप, मंगोलिया, कॅनडा, चीन आणि जपानच्या काही भागातील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. पूर्वी जमिनीवर तीन फुटांपर्यंत उंचीचे बर्फाचे थर पहायला मिळायचे. आता त्यांची जाडी कमी झाली आहे. वातावरणातील या बदलामुळे जगाच्या हवामानावर परिणाम होत आहे. यंदा डिसेंबर अखेरपर्यंत धरणावर पक्ष्यांचे बऱ्यापैकी आगमन होईल अशी आशा आहे.

पक्षीमित्रांना उत्सुकता

नेमेचि येतो हिवाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी पक्षीमित्रांना उत्सुकता असते. हजारो किलोमीटरचा प्रवास हवाईमार्गे करून आपल्या परिसरातील जायकवाडी धरणाच्या पाणवठ्यांवर येणाऱ्या रंगीबेरंगी, विदेशी स्थलांतरित, करणारे चिमणी एवढ्या असणाऱ्या धोबी पक्ष्यापासून ते उंच व देखण्या करकोचांची, बदकांची, शिकारी पक्ष्यांची, झुडपी खगांची पक्षी स्थलांतरणाला सुरुवात झाली असली तरी जलाशयांना आता विदेशी फ्लोमिंगो या देखण्या पक्ष्यांची प्रतीक्षा लागली आहेत.

पक्षीप्रेमी पैठण शहरातील पक्ष्यांच्या आवडत्या ठिकाणांना, आजूबाजूच्या पाणवठ्यांना भेटी देत आहेत. अद्याप स्थलांतरित पाहुण्यांचे आगमन झालेले नाही. हिवाळी पाहण्यांचे पक्षी संमेलन पक्षीप्रेमींसाठी हिवाळी पाहुण्यांचे पक्षी संमेलन म्हणजे पर्वणीच असते. बार हेडेड गुज, पिनटेल, पोचार्ड, जंगवेल, सेंड पायपर, ग्रीन शंक, रेड शंक, व्हॅगटेल, चक्रवाक अशा पक्ष्यांना टिपण्यासाठी छायाचित्रकार जायकवाडी पक्षी अभयारण्यात वेळ घालवतात यंदा मात्र पक्ष्यांची आतुरतेने प्रतीक्षा करण्यात येत आहे.

पक्ष्यांची हक्काची जागा हिरावली

यंदा जायकवाडी धरण १००% भरलेले असून लगतच्या गाळपेरा क्षेत्रात शेती होत असल्याने पक्ष्यांना यंदा उतरण्यासाठी जागा राहिलेली नाही. शिवाय शेंद्रा औद्योगिक वसाहत, जालना पाणीपुरवठा योजनासहीत अनेक योजनाच्या इमारतीचे बांधकाम झाल्याने या बांधकामामुळे पक्ष्यांची बसण्याची हक्काची जागा हिरावली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news