Crime News : आरोपी विशाल राठोडने उज्जैनवरून आणले पिस्तूल

करण आडेच्या पोलिस कोठडीत २२ मार्चपर्यंत वाढ
Sambhajinagar Crime News
आरोपी विशाल राठोडने उज्जैनवरून आणले पिस्तूलfile photo
Published on
Updated on

The accused, Vishal Rathod, brought the pistol from Ujjain

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा निवृत्त प्रा. राजाभाऊ लोंढे हत्या प्रकरणाच्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल राठोडने हत्येसाठी वापरलेले पिस्तूल थेट मध्य प्रदेशातील उज्जैन येथून आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे, या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी करण आडे याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने २२ मार्चपर्यंत वाढ करण्याचे गुरुवारी (दि.१९) आदेश दिले आहेत.

Sambhajinagar Crime News
Crime News : दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

अधिक माहितीनुसार, गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल राठोडच्या घरझडतीत पोलिसांनी अॅपल कंपनीचा लॅपटॉप, गुन्ह्यासंदर्भात महत्त्वाचे दस्ताऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार (एमएच-४६-बीए-६५९८) जप्त केली आहे. तर मृत लोंढे यांना पुरताना वापरलेले दोन फावडे आरोपी आडे याच्याकडून पोलिसांनी जप्त केले आहेत.

दरम्यान, यापूर्वी अटकेतील मुख्य आरोपी विशाल राठोडच्या पोलिस कोठडीतही २२ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे, तर आरोपी आकाश पवार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आरोपी करण आढे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी मृताच्या अंगठ्या व मोबाईल आरोपींकडून हस्तगत करणे बाकी आहे.

Sambhajinagar Crime News
Jalna Crime : अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता का आणि गुन्ह्याचा नेमका हेतू काय होता, याचा तपास बाकी असल्याने आर ोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखेचे एसीपी अशोक राजपूत, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि टीम करत आहेत.

आरोपीचे साथीदार रडारवर

आरोपी विशाल राठोडने हत्येनंतर ४० दिवस पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक केली. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला मदत करण-रेही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. हत्येनंतरच्या काळात विशाल कुठे कुठे गेला? कोणाला भेटला? त्याने कोणाशी संपर्क केला? प्रा. लोंढे यांचा मोबाईल पुण्यात कोणी नेला ? या सर्व अनुत्तरित प्रश्नांवर तपास अद्याप बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news