Jalna Crime : अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पावणेदोन किलो चांदीसह दुचाकी जप्त, आरोपीला बुधवारपर्यंत वाढीव पोलिस कोठडी
Jalna Crime News
अंबड ः आरोपीसोबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस निरीक्षक संतोष घोडके, सपोनि. निरीक्षक अमोल गुरले आदी दिसत आहेत.pudhari photo
Published on
Updated on

अंबड : सराफा दुकान फोडणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला सोमवार दि. 2 रोजी न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवस वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, अंबड शहरातील विनोद गोवींदराव चित्राल यांचे राघव ज्वेलर्स नावाचे दुकान फोडुन त्यातुन सोन्या चांदीचा माल चोरुन नेला होता. हा गुन्हा आरोपी बाळु शिरसाठ रा. कुंभेफळ ता.जि.जालना याने आपले दोन फरार साथीदार संतोष ओंकार गायकवाड रा. तलवाडा ता. अंबड व त्याच्या साथीदारांनी मिळुन हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते.

Jalna Crime News
Jalna News : 21 वर्षांच्या आत विवाह करणाऱ्या मुली झाल्या लखपती

या गुन्ह्यातील मास्टर माईंड आरोपी संतोष ओंकार गायकवाड हा दि.27 फेब्रुवारी रोजी रात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास मौजे कुंभेफळ ता. जालना येथील शेतवस्तीवर आल्याची गोपणीय बातमी पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक प्रमुख पोउपनि बी.बी. नरोडे व सोबत पोहेकॉ यशवंत मुंढे, पोहेकॉ दिपक पाटील, पोकॉ अरुन मुंढे, पोकॉ तुकाराम मदन, यांनी सुमारे अडिच ते तिन किलोमिटर पायी कुंभेफळ येथील शेत वस्तीवर जावुन आरोपी झोपलेल्या रुमच्या चारही बाजुने घेराव घातला.

आरोपी पळुन जात आसताना पोकों. अरुण मुंडे, तुकाराम मदन यांनी आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. आरपीला विश्वासात घेवुन विचारपुस केली असता यातील आरोपी राघव ज्वेलर्स अंबड येथे त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेले एकुण 1 किलो 745 ग्रॅम चांदी व वडीगोद्री येथुन चोरलेली हिरो कंपनीचे फॅशन प्लस मो.सा.क्र. एम एच 21 सी सी 3695 हि जप्त केली आहे. या गुन्ह्याचा तपास अमोल गुरले हे करीत आहे.

Jalna Crime News
Government land encroachment : रहिवासी भागात धुरकट उद्योग सुरुच; विनापरवाना चालतो कारखाना

दोन दिवसांची वाढीव कोठडी

आरोपीने घनसावंगी पो.स्टे. हद्दीतील रांजनी येथील सुदर्शन मांडवे यांचे सोन्या चांदीचे दुकान, रांजनी येथील कौसर शेख यांची कपडयाची दुकान, पोलीस गोंदी हद्दीत वडीगोद्री येथील सुनिल कुऱ्हाडे यांची दुचाकी, पो.स्टे. शेवगाव जि.अहिल्यानगर येथील चार चाकी वाहन चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडुन अजुनही गुन्हे उघड़कीस येण्याची शक्यता आहे. यामुळे आरोपीस आज सोमवारी दि. 2 रोजी न्यायालयात हजर केले असता पुन्हा बुधवार पर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news