Vaijapur Car Accident : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, महिला जागीच ठार; ३ चिमुकल्यांसह ५ जण जखमी

समृद्धी महामार्गावर वैजापूर शहरालगत असणाऱ्या डवळा शिवारात घडला अपघात
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, महिला जागीच ठार; ३ चिमुकल्यांसह ५ जण जखमी
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, महिला जागीच ठार; ३ चिमुकल्यांसह ५ जण जखमीFile Photo
Published on
Updated on

Terrible car accident on Samruddhi Highway, woman killed on the spot

वैजापूर : नितीन थोरात

समृद्धी महामार्गावर वैजापूर शहरालगत असणाऱ्या डवळा शिवारात आज (मंगळवार) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर एका पुरूषाचा उपचारा साठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर तिघा चिमुकल्यांसह चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, महिला जागीच ठार; ३ चिमुकल्यांसह ५ जण जखमी
Maharashtra SSC Result 2025: दहावीचा निकाल जाहीर ; ९८.८२ टक्केवारीसह कोकण विभाग अव्वल

नाशिकहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना कारला पाठिमागून अज्ञान वाहनाने धडक दिल्‍याने अपघात झाल्‍याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाली आहे. या भीषण अपघातात पूनम चव्हाण (वय 30) तर देवानंद चव्हाण (21) या दाेघांचा मृत्यू झाला आहे. तर अजयकुमार चव्हाण (38), नॅन्सी चव्हाण (8), अनन्या चव्हाण (5) आणि पियानसी (6) हे चारजण जखमी झाले आहेत.

या अपघातात जखमींमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. अन् त्यांच्या आईचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कारला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, महिला जागीच ठार; ३ चिमुकल्यांसह ५ जण जखमी
India-Pak tensions | जम्मू-अमृतसरसह 'या' शहरांतील आजची उड्डाणे रद्द

या अपघातात तीन चिमुकल्‍या मुलांच्या आईचा मृत्‍यू झाल्‍याने ही तीन्ही चिमुरडी आईच्या मायेपासून पोरकी झाली आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. यावेळी रडणाऱ्या चिमुरड्या पोरांना पाहून उपस्‍थितांचे डोळेही पाणावले.

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, महिला जागीच ठार; ३ चिमुकल्यांसह ५ जण जखमी
Aamir Khan Mahabharat : आमिर खान 'कृष्‍ण', तर १८०० कोटींचा अभिनेता साकारणार 'अर्जुन'! या चर्चेने चाहत्‍यांची उत्‍कंठा शिगेला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news