मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडविण्यासाठी दशसूत्रीची आवश्यकता : जिल्हाधिकारी

सरस्वती भुवनमध्ये दोन अध्यासन केंद्रांचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
sambhajinagar news
मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडविण्यासाठी दशसूत्रीची आवश्यकता : जिल्हाधिकारीfile photo
Published on
Updated on

Ten principles needed to create value-oriented students: District Collector

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय संस्कृतीत असलेल्या उच्चतर मूल्यांपासून दुरावत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांसह पालक व समाजाचीही तितकीच जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवारी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत बोलताना केले.

sambhajinagar news
Digital Census : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ एप्रिलपासून डिजिटल जनगणनेचा बिगुल

सरस्वती भुवन कला व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्थापन स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र आणि गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्र या दोन अध्यासन केंद्राचे उद्घाटन स्वामी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स.भु. चे अध्यक्ष अॅड. दिनेश वकील होते. व्यासपीठावर इंटेलिजन्स ब्युरोचे डेप्युटी कमिशनर रवींद्र पाटील यांची उपस्थिती होती.

स्वामी पुढे म्हणाले विद्याथ जीवनातलं हरवत चाललेलं चैतन्य, अस्थिरता आणि समाजमाध्यमांचे प्राबल्य अशा पार्श्वभूमीवर दशसूत्री-संस्कारमूल्यांची रूजवणूक विद्यार्थी जीवनात मागदर्शक ठरणारी आहे. दशसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे व संस्काराचे सिंचन व्हावे, देशप्रेम, मातृ-पितृ व गुरू भक्ती याचे संस्कार व्हावेत, अध्यापन पध्दतीत नावीन्याची कास धरली जावी, भविष्यवेधी शिक्षणाची आवश्यकता व अद्ययावत ज्ञानमय शिक्षक कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स.भु. चे डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी अध्यासन केंद्र सुरू करण्यामागील संस्थेची भूमिका विशद करताना स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून घडणाऱ्या तरूण पिढीला गोविंदभाई श्रॉफ यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे अधिष्ठान लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सरस्वती भुवनचे पदाधिकारी, सदस्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

sambhajinagar news
Sambhajinagar River Project : खाम, सुखना नदी प्रकल्पाची कामे पावसाआधी पूर्ण करा

संवेदनशिलता स.भु. जपली

अध्यक्षीय समारोपात स. भु. चे अध्यक्ष अॅड. दिनेश वकील यांनी व्यक्तीच्या जीवनात संवेदनशीलता महत्त्वाची आहे आणि ती सरस्वती भुवनने जपली आहे असे नमूद केले. यावेळी वकील यांनी गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्रासाठी एक लक्ष अकरा हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. सूत्रसंचालन प्रा. विनय पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news