Digital Census : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ एप्रिलपासून डिजिटल जनगणनेचा बिगुल

१८ हजार प्रगणक नियुक्त : प्रत्येक कुटुंबाची होणार ऑनलाईन नोंदणी
Digital Census
Digital Census : जिल्ह्यात १ एप्रिलपासून डिजिटल जनगणनेचा बिगुलfile photo
Published on
Updated on

Digital census to begin in Chhatrapati Sambhajinagar district from April 1

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशातील पहिल्या ऐतिहासिक डिजिटल जन-गणनेच्या प्रक्रियेला महाराष्ट्रासह जिल्ह्यात १ एप्रिल २०२६ पासून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेद्वारे सुरुवात होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या या जनगण-नेत प्रत्येक कुटुंबाचे स्वरूप, उपलब्ध सुविधा आणि मालमत्ता यांची तपशीलवार माहिती गोळा केली जाणार आहे. या महामोहिमेसाठी एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

Digital Census
नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त वैष्णवांचा मेळा

ही जनगणना प्रक्रिया दोन प्रमुख टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात महाऊस लिस्टिंगफ (घरांची नोंदणी) केली जाईल. यासाठी साधारण ८०० लोकसंख्येचा एक मब्लॉकफतयार करण्यात आला असून, प्रत्येक ब्लॉकसाठी एक प्रगणक नियुक्त असेल. सहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक असून संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित तहसीलदार हे चार्ज अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

या मोहिमेसाठी ग्रामीण भागात साधारण १० हजार, तर शहरात ८ हजार प्रगणक नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना विशेष डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले आहे. पश्चिम बंगालसारख्या इतर राज्यांमध्ये स्थलांतरित नागरिकांच्या पडताळणीत आलेल्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन, स्थानिक प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना कागदपत्रांच्या अचूक नोंदीबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Digital Census
MD Ddrugs Selling Case : कन्नडमधून आणलेले एमडी ड्रग्ज विकताना दोघे जेरबंद

नागरिकांना स्वतःची माहिती मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून भरण्यासाठी विशेष पोर्टल दिले जाणार आहे. १ मे ते १५ मे या काळात ज्यांनी आपली माहिती ऑनलाईन भरली असेल, त्यांच्या घरी जेव्हा प्रगणक येतील तेव्हा त्यांचा वेळ वाचणार आहे.

जनगणनेचे वेळापत्रक

१ मे ते १५ मे २०२६ : नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्यासाठी मसेल्फ इन्युमरेशनफपोर्टल उपलब्ध करून दिले जाईल.

१६ मे ते १५ जून २०२६ : प्रगणकांमार्फत प्रत्यक्ष हाऊस लिस्टिंग (घरांची नोंदणी) प्रक्रिया राबवली जाईल.

जुलै ते डिसेंबर २०२६ : गोळा केलेल्या डेटाचे व्हेरिफिकेशन काम होईल.

१ ते २८ फेब्रुवारी २०२७ : प्रत्यक्ष जनगणनेची (लोकसंख्या मोजणी) अंतिम प्रक्रिया पार पडेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news