Sambhajinagar News : तहसीलदारांचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर

डांबरी महामार्ग खोदून जमीनदोस्त प्रकरण : आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्तक्षेपानंतर कारवाईला वेग
Sambhajinagar News
Sambhajinagar News : तहसीलदारांचा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अहवाल सादरfile photo
Published on: 
Updated on: 

Tehsildar submits report to the Sub-Divisional Officer

अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील बाळापूर शिवारात शेतकऱ्यांच्या वंशपरंपरागत वहिवाटीचा जुना राज्य महामार्ग बेकायदेशीररीत्या खोदून त्यातील मुरूम अनधिकृतपणे वाहून नेल्याचा प्रकार सोमवारी (दि. २) उघडकीस आला. यासंदर्भातील वृत्त सर्वप्रथम दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाले होते. या प्रकरणी शेतकऱ्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : जीवन संपवलेल्या १५७ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मायेचा आधार

त्यानंतर सत्तार यांनी तत्काळ उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर महसूल प्रशासनाच्या हालचालींना वेग आला असून, तहसीलदारांनी संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे.

छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या आर.एस. कामठे कंपनीकडून पोकलेनच्या साहाय्याने जुन्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आल्याचा आरोप आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार, अंदाजे ६०० ते ७०० मीटर लांबीपर्यंत, ३० फूट रुंदीपर्यंत व १२ ते १४ फूट खोलीचे खोदकाम करण्यात आले आहे. रात्री-अपरात्री उत्खनन झाल्याचे पंचांनी सांगितले असून, संबंधित कंपनीच्या सुपरवायझरकडे उत्खननाचा परवाना अथवा अधिकृत परवानगी आढळून आली नसल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.

Sambhajinagar News
MP Sandipan Bhumre : शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी मंडळ अधिकारी राणी फड व तलाठी प्राजक्ता आंबुसकर यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या अहवालाच्या आधारे तहसीलदार सागर वाघमारे यांनी बुधवारी (दि ४) उपविभागीय अधिकाऱ्यांकडे संबंधितांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी अहवाल पाठविला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिल्लोड उपविभागातील उपअभियंत्यांना या प्रकरणी सविस्तर कार्यवाही करून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्या मुरुमाचे काय झाले

संबंधित कंपनीच्या अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांनी बाळापूर परिसरातील जुन्या राज्य महामार्गाच्या उत्खननातून निघालेला मुरूम अजिंठा येथील वाघूर नदीवरील पुलाच्या कामासाठी वापरल्याचा संशय शेतकरी व नागरिकांनी व्यक्त केला आहे. संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीचे पोकलेन व टिप्पर परिसरातून हटविण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे उत्खनन केलेल्या मुरमाचे नेमके काय झाले, त्याची वाहतूक कुठे करण्यात आली आणि त्याचा वापर कोठे झाला, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

चार-पाच टिप्पर मुरुमाचे ढिगारे

पुलाच्या परिसरात सध्या केवळ चार ते पाच टिप्पर मुरूमाचे ढिगारे दिसत असताना, उत्खननातून मोठ्या प्रमाणात काढलेला उर्वरित मुरूम नेमका कुठे गेला, त्याचा वापर अन्यत्र करण्यात आला की त्याची परस्पर विक्री करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.